मातृभाषेचा अभिमान बाळगा : प्राचार्य बुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST2021-02-22T04:25:02+5:302021-02-22T04:25:02+5:30

विनायक विद्यालय, विसोरा येथे मातृभाषा दिन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिक्षक, विद्यार्थ्यांनी मातृभाषाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यात मराठी ...

Be proud of your mother tongue: Principal Buddha | मातृभाषेचा अभिमान बाळगा : प्राचार्य बुद्धे

मातृभाषेचा अभिमान बाळगा : प्राचार्य बुद्धे

विनायक विद्यालय, विसोरा येथे मातृभाषा दिन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिक्षक, विद्यार्थ्यांनी मातृभाषाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यात मराठी विषय शिक्षक एस. एम. कापगते यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा संपूर्ण इतिहास सांगितला. तसेच मातृभाषेतून बोलल्यास आपल्या मनातील विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतात. त्यामुळे जगात कुठेही गेल्यास मातृभाषेचा आग्रह करावा, जेणेकरून मातृभाषा संवर्धन होईल. आपण सर्वांनी मातृभाषा बाेलावी, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधीपासून साजरा करण्यात येत आहे, हे सांगितले. मातृभाषा आपल्या जीवनात कशी रूजते, यावरही प्रकाश टाकला. इयत्ता नववीची प्रांजली दुफारे हिने सांगितले की, इंग्रजी भाषेकडे आपण आकर्षित होत असतांना समृद्ध अशा भाषेला विसरता नये वा न्यूनगंड ठेवू नये. यावेळी टी. डी. ठेंगरे, ए. बी. बुराडे उपस्थित होते. सूत्रसंचालन एच. जी. मडावी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

फोटो- कार्यक्रमात प्राचार्यांनी मार्गदर्शन केले, यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Be proud of your mother tongue: Principal Buddha