येडानूर येथे बंजारा समाजाचा मेळावा

By Admin | Updated: January 9, 2017 00:53 IST2017-01-09T00:53:25+5:302017-01-09T00:53:25+5:30

तालुक्यातील येडानूर (पांढरी भटाळ) येथील मठामध्ये बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Banjara community rally at Yedanoor | येडानूर येथे बंजारा समाजाचा मेळावा

येडानूर येथे बंजारा समाजाचा मेळावा

आरोग्य तपासणी : समाजाने एकजूट होण्याचे मान्यवरांनी केले आवाहन
चामोर्शी : तालुक्यातील येडानूर (पांढरी भटाळ) येथील मठामध्ये बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान महाप्रसाद तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण होते. उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गीता गोवर्धन चव्हाण, संत सुरजसिंग महाराज, सलिम बुधवानी, मंगेश रणदिवे, गिरीधर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाश अर्जुनवार यांनी बंजारा समाजातील नागरिकांनी एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. संत सुरजसिंग यांनी श्रीकृष्ण लिला यावर अध्यात्मिक प्रबोधन केले. कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर महाप्रसादाचेही आयोजन केले. यशस्वीतेसाठी सोनपाल साबळे, उदेशिंग धिरबसी, मानसिंग धोती, मोनसिंग मट्टावन, महासिंग सावळे, देवसिंग पडवाल, दिलीप धोती, येमाजी गलई, सुंदरलाल साबळे, संगीता साबळे, पुनरसिंग पेले, फत्तेसिंग धिरबसी, चंदू बंसी, व्यंकटराव साबळे, गीरमा दुधबावरे, श्यामराव कोल्हे, पुरूषोत्तम भांडेकर यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार सरपंच उदेसिंग धीरबसी यांनी मानले.

Web Title: Banjara community rally at Yedanoor