शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आझाद गणेश मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना एक लाखाची मदत

By admin | Updated: September 23, 2015 05:19 IST

अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व इतर खर्च कपात करीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाख

अहेरी : अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व इतर खर्च कपात करीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिले आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे मंगळवारी एका कार्यक्रमात मंडळाच्या वतीने धनादेश सोपविण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, तहसीलदार सुरेश पुप्पलवार, पोलीस निरीक्षक संजय मोरे होते. यावर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट मोठे असल्याने सामाजिक बांधिलकी जपत अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व डेकोरेशनसाठीच्या खर्चात कपात केली. तो निधी एकत्रित करून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. अहेरी येथे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मंडळाचे कौतुक करून आझाद गणेश मंडळाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे स्वप्न साकार केल्याचे सांगितले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणव अशोक यांनी आज सर्वजण डेकोरेशन, ड्रिंक आणि डिजे यावर भर देतात. परंतु या मंडळाने शेतकऱ्यांप्रती आपले सामाजिक दायित्व जोपासल्याचे ते म्हणाले.अहेरीच्या बबलू हकीम यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने आझाद गणेश मंडळाला आर्थिक मदत दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सदस्य अमोल मुक्कावार यांनी केले. तर संचालन गिरीश मद्देलार्वार व आभार अक्षय येन्नमवार यांनी मानले. पुरस्काराची रक्कम शेतकऱ्यांनायाप्रसंगी आझाद गणेश मंडळातर्फे अहेरी येथील चाणक्य स्पर्धा परीक्षा केंद्राला १० हजाराची मदत तसेच अहेरी येथील वैकुंठ रथाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी १० हजार रुपये देण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रवीण पुल्लुरवार यांनी आपल्या पुरस्कारातून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत केली याकरिता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.