शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
3
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
4
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
5
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
6
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
7
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
8
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
9
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
10
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
11
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
12
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
13
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
14
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
15
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
16
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
17
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
18
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
19
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
20
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हात काम करणे टाळा

By admin | Updated: May 30, 2015 02:01 IST

उष्माघातापासून बचावासाठी उन्हात काम करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात भरती करावे, ...

गडचिरोली : उष्माघातापासून बचावासाठी उन्हात काम करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात भरती करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले आहे.
मागील १५ दिवसांपासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्माघाताची शक्यता बळावली आहे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरानहाईट किंवा ४१ अंश सेल्सिअस यापेक्षा जास्त वाढल्यास उष्माघात होण्याचा धोका राहते. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे. याला वैद्यकीय आणीबाणी मानले जाते. उष्माघात हा मेंदू व शरीरातील अंतर्गत अवयवास हानी पोहोचवू शकतो. उष्माघात हा ५० वर्ष वयोगटातील लोकांना तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होण्याची शक्यता राहते. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) राहते. मानवी शरीराच्या तापमानाला समतोल राखण्याची क्रिया सुरू राहते. १०६ अंश फॅरनहाईट जास्त झाल्यास बेशुद्धावस्था येते. क्वचितप्रसंगी रूग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. उष्माघातापासून बचावासाठी शक्यतो उन्हात फिरणे किंवा अंग मेहनतीचे काम करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले आहे.
उन्हाळ्यातच शेतीपूर्व मशागतीला सुरूवात होते. शेतकरी दिवसभर उन्हामध्ये शेतीची कामे करतात. त्यामुळे ग्रामीण भागात उष्माघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. शेतकऱ्यांनी सकाळीच शेतावर जाऊन १० वाजेपर्यंत कामे करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)