अनंतपूर येथे कला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:08 AM2018-01-31T01:08:03+5:302018-01-31T01:08:16+5:30

सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय अनंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

Art gathering at Anantapur | अनंतपूर येथे कला संमेलन

अनंतपूर येथे कला संमेलन

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव : सामकी माता मंडळांतर्गतच्या शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव महल : सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय अनंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जी. एस. चव्हाण, प्रकाश अर्जूनवार, घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक एस. जायभाये, सरपंच जयश्री दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबसी, पोलीस पाटील नामदेव नरोटे, महादेव निकोडे, दादाजी निमडर, काशिनाथ बुरांडे, माध्यमिक शाळेचे प्राचार्य यू. व्ही. ढोके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. चव्हाण, विलास सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जी. आर. धोबी, संचालन आर. व्ही. नाकाडे तर आभार प्रा. वावरे यांनी मानले.

Web Title: Art gathering at Anantapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.