वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:45+5:30

गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The appearance of a tiger on a bow | वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन

वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन

Next
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील एक महिन्यापासून वाकडीच्या जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. वाकडीचा जंगल मुडझा, चांदाळा, गडचिरोलीच्या जंगलाला लागून आहे. गडचिरोली शहरातील नागरिक पहाटेच्या सुमारास चांदाळा, पोटेगाव मार्गे तसेच चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानाकडे फिरायला जातात. हे सर्व रस्ते जंगलाने व्यापले आहेत. वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन झाल्याने फिरायला जाणाºया नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धान पिकाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशातच वाघाची दहशत असल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The appearance of a tiger on a bow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल