शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या : केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांना प्रतिदिवस ३५० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रतिदिवस मानधन देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही त्यांनी केली नाही. सदर आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसह विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आला आहेत. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात २५ पेक्षा कमी मुले नाहीत अशा अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक असलम पठान, विजया पावडे, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा