शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अन् जि.प.च्या अधिकाऱ्यांनी खांद्यावर घेतले ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे.

ठळक मुद्देचिखल आणि नाल्यातून काढली वाट : दुर्गम मरकणार गावात मदत पोहोचवण्यासाठी करावी लागली कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पूरपरिस्थितीने बेजार झालेल्या भामरागड तालुक्यातील मरकणार या अतिदुर्गम गावात मदतरूपाने दैनंदिन गरजेचे साहित्य पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या खांद्यावर आणि डोक्यावर ओझे घेतले. एवढेच नाही तर डोंग्यातून नदी पार करून चिखलमय वाटेवरूनही पायी प्रवास केला. एरवी एसी केबिनमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील गावकऱ्यांच्या मदतीसाठी घेतलेली ही मेहनत त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीसोबत संवेदनशील मनाचा परिचय देणारी ठरली.जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे. पण ते ५५ कुटुंब सततच्या पावसाने बेजार होऊन अतिशय विपरित परिस्थितीत जगत आहे. या गावाला चारही बाजूने नाल्याचे पाणी असल्याने त्या गावापर्यंत मदत पोहचू पोहोचवणे कठीण होते. पण जि.प.च्या अधिकाऱ्यांचा निर्धार पक्का होता. त्यानुसार मंगळवार २४ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या नेतृत्वात त्या गावी मदत पोहचवण्यासाठी निघालेल्या या पथकाने नाल्याच्या पाण्यातून लाकडी डोंग्यावरुन प्रवास केला आणि सर्व साहित्य पलीकडील तिरावर नेले. पण तेथून पुढे गावात जाण्यासाठी धड रस्ताही नव्हता. त्यामुळे चिखलातून वाट काढत सर्व अधिकारी-कर्मचारी आपापल्या डोक्यावर, खांद्यावर साहित्य घेऊन वाटचाल करत त्या गावात पोहोचले.यावळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चौहान, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीशांत कोडप, अभियंता अमित तुरकर, शाखा अभियंता खोकले, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश ढोके, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, विस्तार अधिकारी देवारे यांच्यासह काही ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.या साहित्याचे केले वाटपमदत साहित्यात तांदूळ, चना डाळ, तेल, मीठ, बिस्कीट, टोस्ट ब्लँकेट, ताडपत्री आदी साहित्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांनी यावेळी ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या पुढच्या चार महिन्यात बेली ब्रिज तयार झाल्यानंतर दूर होईल, असा दिलासा दिला. यानंतरही कुठली मदत हवी असेल तर सांगावे आम्ही मदत करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. अतिदुर्गम भागातील लोक कोणत्या परिस्थितीत जगतात हे पहिल्यांदाच या भेटीनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद