शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली बसस्थानक बनले फ्रुटस्टॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 01:36 IST

आलापल्ली बसस्थानकासमोर फळविक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या गंभीर प्रश्नाकडे एसटी विभागाचे ...

फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण : प्रवाशांची होत आहे गैरसोयअहेरी/आलापल्ली : आलापल्ली बसस्थानकासमोर फळविक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या गंभीर प्रश्नाकडे एसटी विभागाचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. आलापल्ली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आलापल्ली येथून अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आष्टीकडे जाता येते. त्यामुळे आलापल्ली हे तालुकास्थळ जरी नसले तरी या ठिकाणी प्रत्येक बस थांबते. त्याचबरोबर आलापल्लीवरून ग्रामीण भागासाठीही बसेस सोडल्या जातात. दरदिवशी हजारो प्रवाशी आलापल्ली मार्गे किंवा आलापल्ली येथून प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात बसस्थानक बांधण्यात आले आहे. या बसस्थानकाच्या सभोवताल आजपर्यंत फळविक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. त्यामुळे बसस्थानक सहजासहजी दिसून येत नव्हते. मात्र आता काही फळविक्रेत्यांनी थेट बसस्थानकासमोरच फळांची दुकाने लावली आहेत. त्यामुळे प्रवाशांनी थांबावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फळविक्रेते बसस्थानकाच्या सावलीचा आडोसा घेत आहेत. तर प्रवाशांना मात्र भर उन्हात रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे. एखाद्या शासकीय इमारतीमध्ये अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असली तरी हा नियम आलापल्ली येथे पायदळी तुडविला जात आहे. आज एकच दुकान समोर थाटण्यात आले असले तरी भविष्यात या दुकानदारावर नियंत्रण न ठेवल्यास बसस्थानकासमोरील संपूर्ण जागा हडप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)