शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली जिल्हा आता लेव्हल-१ मध्ये माेडत असल्याने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जिल्ह्याचा लेवल १ मध्ये समावेश; हाॅटेल, माॅल रात्री १० पर्यंत उघडी राहतील

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली जिल्हा आता लेव्हल-१ मध्ये माेडत असल्याने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. साेमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी २१ जून राेजी काढले आहेत. 
सर्वच प्रकारची दुकाने नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. रेस्टाॅरंट, उपहारगृहे, माॅल, सिनेमागृहे सकाळी ७ ते रात्री  १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने नियमित सुरू ठेवता येतील. शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेेवता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनाेरंजन इत्यादी गर्दीची ठिकाणे साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काेविड निर्देशांच्या अधीन राहून ५० टक्के क्षमतेच्या आत व कमाल मर्यादा १०० लाेकांची राहील. विवाह कार्यक्रमाला १०० व  अंत्यविधीस ५० लाेकांच्या उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड ठाेठावला जाईल. 
कृषीविषयक दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू राहण्यास पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.  बाजारपेठेची वेळ वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यापूर्वीच्या आठवड्यापर्यंत गडचिराेली जिल्हा 
लेव्हल-३ मध्ये माेडत हाेता. मात्र, १७ जून राेजीच्या काेराेना रिपाेर्टनुसार गडचिराेली जिल्हा आता 
लेव्हल-१ 
मध्ये आला आहे. गडचिराेली जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट 
३.५३ एवढा आहे. 
एकूण ८६४ बेडपैकी 
१० बेडवर रुग्ण आहेत, तर ८५४ बेड रिकामे आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार