शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच नगर पंचायतींचे निवडणूक निरीक्षक जाहीर

By admin | Updated: October 4, 2015 02:14 IST

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूक शांततेत व नियोजनानुसार पार पाडण्यासाठी ....

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूक शांततेत व नियोजनानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक निरीक्षक व मुख्य निवडणूक निरीक्षक जाहीर केले आहेत. मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून चंद्रपूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे काम सांभाळणार आहेत. चामोर्शी नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून सहायक वनसंरक्षक चंद्रपूर, एटापल्लीचे निवडणूक निरिक्षक म्हणून चंद्रपूर येथील जिल्हा कृषी अधीक्षक, कुरखेडाचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी काम पाहणार आहेत. मुलचेरा नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून ब्रह्मपुरीचे सहायक वनसंरक्षक काम पाहणार आहेत. कोरची नगर पंचायतीचे निवडणूक निरिक्षक म्हणून टेक्सटाईलचे नागपूर येथील सहसंचालक (प्रशासन) काम पाहणार आहेत. अहेरी नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून उद्योगाचे सहसंचालक राहणार आहेत. भामरागडचे निवडणूक निरीक्षक म्हणून प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी नागपूर, धानोराचे निवडणूक निरीक्षक म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर व सिरोंचा नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा मुद्रांक निबंधक चंद्रपूर हे काम पाहणार आहेत. निर्वाचन अधिकारी म्हणून स्थानिक तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहायक निर्वाचन अधिकारी म्हणून त्याच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगर पंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच घेतली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे. त्याचबरोबर निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)