शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांनी शोधली नवीन शक्कल

By admin | Updated: September 11, 2016 01:33 IST

दारूची वाहतूक करण्यासाठी दारूविक्रेत्यांकडून नेहमीच नवनवीन शक्कल लढविली जाते.

जिमलगट्टातील घटना : तेलाच्या पिप्यात दारूच्या बॉटल्याजिमलगट्टा : दारूची वाहतूक करण्यासाठी दारूविक्रेत्यांकडून नेहमीच नवनवीन शक्कल लढविली जाते. या नवीन शक्कलीमुळे पोलिसांना चकमा देत दारूविक्रेते त्यांच्यासमोरूनच चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक करतात. असाच एक नावीण्यपूर्ण प्रकार जिमलगट्टा येथे उघडकीस आला आहे. दारूविक्रेता तेलाच्या टिनात व मिक्सरच्या डब्ब्यात दारूची वाहतूक करीत होता. जिमलगट्टा पोलिसांच्या चाणक्ष नजरेमुळे सदर दारू लक्षात येऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अहेरी-सिरोंचा मार्गावरून नेहमीच दारूची वाहतूक केली जाते. त्यामुळे जिमलगट्टा पोलिसांकडून अधूनमधून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अशाच प्रकारे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान समय्या मल्ला दुर्गम रा. सूर्यापल्ली याच्या दुचाकीविषयी पोलिसांना संयश आल्याने पोलिसांनी त्याची दुचाकी थांबविली. त्याच्या दुचाकीवर तेलाचा टिन व मिक्सरचा खोका असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, तेलाचा टिन व नवीन मिक्सर घेतला असून तो आपल्या गावाकडे नेत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संशय आल्याने या डब्ब्याची तपासणी केली असता, अतिशय शिताफीने दुर्गमने तेलाच्या डब्ब्यासह मिक्सरच्या बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बॉटल भरून ठेवल्या होत्या. दोन्ही डब्बे उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली. पोलिसांनी समय्या दुर्गमच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.त्याच्याकडील ८६ निपा विदेशी दारू व दुचाकी असा ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विवेक सिसाळ, सखाराम बिराजदार व जलद प्रतिसाद पथकाच्या जवांनांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सिडाम करीत आहेत. दुर्गम याची नवीन शक्कल बघून पोलिसही चकरावले. (वार्ताहर)