शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली-भामरागड मार्ग बंद

By admin | Updated: September 2, 2016 01:25 IST

भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगावजवळ नाला तुडूंब भरून वाहत असल्याने जवळजवळ सहा तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती

सहा तास वाहतूक राहिली ठप्प : बोटनफुंडी, ताडगाव नाल्यावर तीन फूट पाणीगडचिरोली/भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगावजवळ नाला तुडूंब भरून वाहत असल्याने जवळजवळ सहा तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आलापल्ली व भामरागड भागाकडून वाहने या नाल्याजवळ उभे होते. जवळजवळ चार तास ही वाहतूक ठप्प राहिली. भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगाव, बोटनफुंडी हे दोन नाले लागतात. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत असल्याने भामरागड परिसरात नाले तुडूंब वाहत आहेत. त्यामुळे हा मार्ग आज बंद झाला. गडचिरोली जिल्ह्यात १ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात अहेरी येथे ६.४, एटापल्ली येथे ६.८, धानोरा येथे ०.९, कोरची येथे १.७, भामरागड येथे १ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात सरासरी १.६ मीमी पाऊस गुरूवारी झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ११५०.४ मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत या पावसाळ्यात ८४.९ टक्के पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख कृष्णा रेड्डी यांनी लोकमतला दिली आहे. भामरागड तालुक्यात ताडगाव, बोटनफुंडी या दोन्ही नाल्यांना पूर आल्याने तीन फूट पाणी रस्त्यावर आले होते. बोटनफुंडी, विसामुंडी, वठेली, कत्रनगट्टा आदी गावांचा भामरागड परिसराशी संपर्क तुटलेला होता. गुरूवारी दुपारी गडचिरोलीसह जिल्ह्यात चांगल्या पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे बळीराजाने पावसातच बैल पोळ्यात नेले. पाऊस आल्यामुळे पोळा सणावर विरजन पडले असले तरी धानपिकाला या पावसाचा मोठा लाभ होणार असल्याने ग्रामीण भागात पोळा सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. (तालुका प्रतिनिधी)