शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळी सणात लालपरी रुसली; 11 दिवसांत 2 काेटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने अधिकचे उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र संपामुळे ही संधी गमावली आहे. मागील ११ दिवसांपासून एसटी वाहने आगारातच थांबली आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे तसेच इतर मागण्यांसाठी गडचिराेली जिल्ह्यातील अहेरी व गडचिराेली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टाेबरपासून संप पुकारला आहे. सलग ११ व्या दिवशीही संप सुरूच आहे. संपामुळे गडचिराेली व अहेरी आगाराचे मिळून ११ दिवसात सुमारे २ काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांची कृती समिती तयार करून या समितीच्या नेतृत्वात २८ ऑक्टाेबरपासून संपाला सुरुवात केली. काही मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला हाेता. मात्र विलिनीकरणाच्या मागणीला धरून पुन्हा ३० ऑक्टाेबरपासून संपाला सुरुवात झाली. हा संप अजूनही कायम आहे. गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने अधिकचे उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र संपामुळे ही संधी गमावली आहे. मागील ११ दिवसांपासून एसटी वाहने आगारातच थांबली आहेत. 

खासगी वाहनांचे तिकीट दर जैसे थेएसटीच्या संपाचा गैरफायदा घेऊन खासगी वाहनांचे दर वाढविले जातील, अशी शक्यता वर्तविली जात हाेती. मात्र खासगी वाहतूकदारांनी पूर्वी एवढेच दर कायम ठेवले आहे. गडचिराेली ते नागपूर खासगी एसी वाहनासाठी २५० रुपये तर साधारण वाहनासाठी २०० रुपये भाडे आकारले जात आहे. चंद्रपूरसाठी ११० रुपये, मूल ६० रुपये, सावली ५० रुपये एवढा दर आकारला जात आहे. हा दर पूर्वी एवढाच आहे. 

दर दिवशी १८ लाखांचे नुकसान-    गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. अहेरी आगारात एकूण ७८ बसेस आहेत. या आगारातून दरदिवशी जवळपास आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. संपामुळे या उत्पन्नावर पाणी फेरल्या गेले आहे. 

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप