शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्राचे मालक बनले कृषी तज्ज्ञ

By admin | Updated: October 27, 2014 22:35 IST

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत

वैरागड : मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करीत नसले तरी अनेक कृषी केंद्रावरील मालकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना औषध फवारणीचा सल्ला देत आहेत. एका पंपाला दोन झाकण औषध वापरा, असे अनेक कृषी केंद्रधारकांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.जिल्हा कृषी विभागाकडून विविध योजनांची मोठी प्रसिद्धी झाली. पण रासायनिक खत अनेकांच्या बांधावर पोहोचला नाही. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या योजनाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. रोवणीचे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे वर्तमानपत्रातून दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धानपिकावर विविध रोगांचे सावट आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला मिळत नाही. मात्र कृषी केंद्रधारकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी एका पंपाला दोन झाकण औषधी फवारा म्हणजे तुमच्या धानपिकावरील रोग लवकर नष्ट होईल, असा सल्ला ग्रामीण शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांचाही कृषी केंद्रधारकांच्या सल्ल्याला प्रतिसाद आहे. (वार्ताहर)