शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांनंतर जंगली हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेशही केला हाेता; परंतु एक-दाेन दिवसांतच पुन्हा देसाईगंज तालुक्यात व त्यानंतर आरमोरी तालुक्यात हत्ती परतले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : देसाईगंज व आरमाेरी तालुक्यात धुमाकूळ घालून पिकांचे नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचा कळप १८ दिवसांनंतर पुन्हा कुरखेडा तालुक्यात दाखल झाला. या कळपाने तालुक्यातील अरतताेंडी येथे मंगळवारी मध्यरात्री आश्रमशाळा संरक्षक भिंत व पिकांची नासधूस केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तींविषयी धास्ती निर्माण झाली आहे.२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेशही केला हाेता; परंतु एक-दाेन दिवसांतच पुन्हा देसाईगंज तालुक्यात व त्यानंतर आरमोरी तालुक्यात हत्ती परतले. तब्बल १८ दिवसांनंतर परत येऊन मंगळवारी, दि. १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेच्या संरक्षक भिंतीची मोडतोड केली, तसेच येथील शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे उपसून नासधूस केली. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अरतताेंडी येथील सायत्रा कुमरे, ईश्वर नरोटे, देवाजी तुलावी, क्षीरसागर दखणे, आदी शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे हत्तींनी उपसले. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी हेमंत खुणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, हत्तींचा कळप पुन्हा परतल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीची दहशत शेतकऱ्यांमध्ये असून नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.

हे आहे हत्तींचे लक्ष्य-    जंगली हत्ती गेल्या दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. यात ते शेतातील पिकांची माेठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत. जंगली हत्ती विशेषत: धानाचे पुंजणे, तुरीचे पीक, उडीद, मूग यासारखी कडधान्य पिके, घरी संकलित माेहफुले, आदी खात असून नासधूस करीत आहेत. याशिवाय शेतातील माेटार पंप व त्याचे लाेखंडी पाईप, प्लास्टिक पाईप, रस्त्यालगतचे लाेखंडी बाेर्ड व लहान घरे, आदींची नासधूस करीत आहेत. हे सर्व जंगली हत्तींचे लक्ष्य ठरत आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव