शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील ४७६ विषय शिक्षकांचे समायोजन

By admin | Updated: March 21, 2017 00:46 IST

रिक्त असलेल्या जागांवर विषय शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद सभागृहात ...

दोन हजार शिक्षकांना बोलाविले : विकल्प भरण्यासाठी जिल्हा परिषदेत उसळली मोठी गर्दीगडचिरोली : रिक्त असलेल्या जागांवर विषय शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद सभागृहात रविवारी व सोमवारी समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान ४७६ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या संचमान्यतेनुसार रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची नेमणूक करायची होती. सर्वप्रथम मुख्याध्यापकांचे समायोजन शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर विषय शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारपासून राबविण्यास सुरूवात झाली. समायोजनासाठी जवळपास दोन हजार शिक्षकांना बोलविण्यात आले होते. विषय शिक्षकांमध्ये विज्ञान व गणित शिक्षकाच्या ३७९ जागा, भाषा विषयाच्या ८१ जागा, सामाजिकशास्त्र विषयाच्या १६ जागा रिक्त होत्या. रविवारी भाषा, सामाजिकशास्त्र विषयाच्या जागा भरण्यात आल्या. विज्ञान व गणित विषयाच्या जागा सोमवारी समायोजनाच्या माध्यमातून भरण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. याच दरम्यान पदवीधर शिक्षकांच्या ६३ जागा सुध्दा भरण्यात आल्या आहेत. पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला होता. मात्र जुन्या यादीप्रमाणेच शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पुढे राबविण्यात आली. विकल्प भरण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेत शिक्षकांची गर्दी होती. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील व एटापल्ली तालुक्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने संचमान्यताच केली नसल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे दोन्ही मुख्याध्यापकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करीत दोन्ही मुख्याध्यापकांकडील पद काढून त्यांना विषय शिक्षक म्हणून नेमण्यात आले. (प्रतिनिधी)