शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथाशी जीवनाची सांगड घाला- जयस्वाल

By admin | Updated: January 21, 2016 00:10 IST

साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो.

तीन दिवसीय कार्यक्रम : गं्रथ महोत्सवाचे थाटात उद्घाटनगडचिरोली : साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो. ग्रंथातून विचारांची देवाणघेवाण होते. ग्रंथातील विचार आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची गरज आहे. त्याकरिता ग्रंथ , पुस्तकाच्या मर्माशी जीवनाची सांगड घाला, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथे शिवाजी महाविद्यालयाच्या कवीवर्य मंगेश पाडगावकर नगरीत ग्रंथ महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणूून माजी प्राचार्य डॉ. एन. एस. पठाण, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, जि. प. समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, आर. पी. निकम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, समशेर खॉ पठाण आदी उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. डॉ. जयस्वाल म्हणाले, पुस्तक वाचनातून संस्कारशीलता निर्माण होते, पालकांनी ग्रंथ वाचनाची सवय लावल्यास मुलेही वाचन संस्कृतीकडे वळतील, पुस्तक वाचल्यानंतर मन व बुद्धीची सुपिकता चांगली राहिल्यास नक्कीच पुस्तकरूपी ज्ञानाचे अंकुर बहरल्याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी डॉ. एन. एस. पठाण म्हणाले, ग्रंथ मानवाचे गुरू आहेत. माणसाला सदैव जागे ठेवण्याचे महत्त्वाचे काम ग्रंथ व पुस्तके करतात. देशात सहिष्णूता टिकविण्यात ग्रंथ परंपरेचा मोठा वाटा आहे, देशात १९२५ च्या पूर्वी अनेक मोठे विचारवंत होऊन गेले. त्यानंतर ८५ वर्षांच्या काळात नव्या विचाराची निर्मिती झाली नाही, असेही ते म्हणाले. आपण काय वाचतो यापेक्षा आपण कसे वाचतो याला अतिशय महत्त्व आहे. आपल्यातील दडलेली प्रतिभाशक्ती जो आपल्याला सांगतो तोच खरा गुरू व शिक्षक आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून वाचन संस्कृतीतून विचारसंपन्न व्हा, असे आवाहन डॉ. पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, संचालन नंदकिशोर मांडवे, विद्या आसमवार यांनीे तर आभार विभा डांगे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)