बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच

By Admin | Updated: December 17, 2015 01:34 IST2015-12-17T01:34:27+5:302015-12-17T01:34:27+5:30

तालुक्यातील कांचनपूर येथील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अंगणवाडीत नेऊन बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

The accused accused in the rape case | बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच

बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच

अंगणवाडीतील कृत्य : कांचनपूरची घटना
मुलचेरा : तालुक्यातील कांचनपूर येथील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अंगणवाडीत नेऊन बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
आपल्या काकाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कांचनपूर येथील श्रीकांत सुभाष बिश्वास (२३) या नराधम इसमाने १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास अपहरण करून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या अंगणवाडी केंद्रात नेले. मुलीचे तोंड व हात कपड्याने बांधून सदर मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने मुलीला खुंटीला बांधून आरोपी फरार झाला. याबाबत अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अहेरी पोलिसांनी भादंविच्या ३७६, ३६३, ३४१ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या ३ व ४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण दीडवाघ करीत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे.

Web Title: The accused accused in the rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.