शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

८ आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: September 17, 2014 23:48 IST

एटापल्लीचे माजी पं. स. उपसभापती केशव पुडो यांच्या अपहरण प्रकरणी अहेरी न्यायालयाने ८ आरोपींना २६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एटापल्ली : एटापल्लीचे माजी पं. स. उपसभापती केशव पुडो यांच्या अपहरण प्रकरणी अहेरी न्यायालयाने ८ आरोपींना २६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये एटापल्ली पंचायत समितीचे विद्यमान सभापती संजय चरडुके, विनोद चरडुके, विश्वजीत सरकार, नसरू शेख, आशिफ घोनमोडे, महेश मंचावर, सतिश मुप्पलवार रा. सर्व एटापल्ली व दिवाकर नागापुरे रा. पंदेवाही यांचा समावेश आहे. आलापल्लीवरून एटापल्लीकडे चारचाकी वाहनाने सहकाऱ्यांसोबत येत असतांना एटापल्लीचे माजी पं. स. उपसभापती केशव पुडो यांचे वाहन अज्ञात इसमांनी रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करेम फाट्याजवळ अडवून त्यांचे अपहरण केले होते. यासंदर्भात गयाबाई पुडो यांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रे फिरवून विद्यमान पं. स. सभापती संजय चरडुके याला १४ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्यावर तसेच या प्रकरणातील उर्वरित ७ ही आरोपींवर एटापल्ली पोलिसांनी कलम ३६५, ३६४, ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी १५ सप्टेंबरला संजय चरडुके याला अहेरीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्य ७ आरोपींना १५ व १६ सप्टेंबर रोजी अटक करून मंगळवारी अहेरीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व ८ आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील सुमित आत्राम व विक्की आत्राम रा. अहेरी या दोन आरोपींवर एटापल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदर दोनही आरोपी अद्यापही फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस निरीक्षक किरण अवचार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)