७१ अंगणवाडी केंद्रांच्या नवीन इमारतींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:29 PM2019-03-18T22:29:33+5:302019-03-18T22:29:52+5:30

आकांक्षित गडचिरोली जिल्हा कार्यक्रमातून आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्र मिळून गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ अंगणवाडीसाठी नव्या इमारतीचे काम करण्यात येणार आहे.

71 new buildings of Anganwadi centers are approved | ७१ अंगणवाडी केंद्रांच्या नवीन इमारतींना मंजुरी

७१ अंगणवाडी केंद्रांच्या नवीन इमारतींना मंजुरी

Next
ठळक मुद्दे१२ कोटीतून होणार काम : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आकांक्षित गडचिरोली जिल्हा कार्यक्रमातून आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्र मिळून गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ अंगणवाडीसाठी नव्या इमारतीचे काम करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यात १ हजार ७७१ मोठ्या अंगणवाडी व ५१६ मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. यापैकी काही अंगणवाडी केंद्रासाठी पक्क्या स्वरूपाची इमारत नाही. परिणामी अंगणवाडी शाळा इमारत, गोटूल भवन, काही ठिकाणी भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन अंगणवाडी केंद्र इमारतीची नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली. या कामांना शासन व जिल्हा परिषदेने मान्यता प्रदान केली आहे. सदर अंगणवाडी इमारतीचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.
मंजूर करण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये आदिवासी क्षेत्रातून ५४ अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील आठ, आरमोरी दोन, भामरागड दोन, चामोर्शी आठ, देसाईगंज एक, धानोरा सात, एटापल्ली सहा, गडचिरोली एक, कोरची दोन, कुरखेडा पाच, मुलचेरा एक व सर्वाधिक सिरोंचा तालुक्यातील ११ अंगणवाडी केंद्र इमारतींचा समावेश आहे.
बिगर आदिवासी क्षेत्रामधून आरमोरी तालुक्यातील दोन, चामोर्शी सात, देसाईगंज तीन, गडचिरोली तीन व मुलचेरा तालुक्यातील दोन अंगणवाडी केंद्र इमारतींचा समावेश आहे.
सदर कामे मार्गी लावण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागाकडून मिळाली आहे.
७१ नवीन अंगणवाडी केंद्र इमारती व इतर अंगणवाडी इमारतीच्या दुरूस्तीच्या कामासाठी एकूण १२ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. आदिवासी क्षेत्रामधील नव्या अंगणवाडी केंद्र इमारतीसाठी प्रत्येकी ११.२८ लाख तर बिगर आदिवासी क्षेत्रातील इमारतीसाठी १०.१० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
४५० अंगणवाडी इमारतीची किरकोळ दुरुस्ती होणार
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून ४५० अंगणवाडी केंद्र इमारतीच्या किरकोळ दुरूस्तीचे काम प्रस्तापित करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ५९, आरमोरी ३०, भामरागड २५, चामोर्शी ६२, देसाईगंज २१, धानोरा ३५, एटापल्ली ५२, गडचिरोली ३१, कोरची १७, कुरखेडा २५, मुलचेरा २४ व सिरोंचा तालुक्यातील सर्वाधिक ३९ केंद्रांचा समावेश आहे. अंगणवाडी केंद्राच्या किरकोळ दुरूस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये खर्चाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Web Title: 71 new buildings of Anganwadi centers are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.