शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांत मलेरियाचे ६१७ रूग्ण आढळले

By admin | Updated: November 15, 2014 22:46 IST

एटापल्ली या आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, मागास तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदम्यान आरोग्य विभागाच्यावतीने आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ३ हजार ३२ रूग्णांचे

एटापल्ली : एटापल्ली या आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, मागास तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदम्यान आरोग्य विभागाच्यावतीने आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ३ हजार ३२ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. १० दिवसात यापैकी तब्बल ६१७ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले असल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. एटापल्ली तालुक्यात तोडसा, गट्टा, कसनसूर आदी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत एकूण ३८ उपकेंद्र आहेत. एटापल्ली तालुका मुख्यालयी एकमेव ग्रामीण रूग्णालय आहे. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १५३ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १८१ व गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०४ रूग्ण मलेरियाने बाधीत आढळून आले. एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सर्वाधिक १७९ रूग्ण मलेरियाने बाधीत आढळून आले. मागील महिन्यात म्हणजे आॅक्टोबरमध्ये तालुक्यात एकूण १९ मलेरिया बाधीत रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात केवळ १० दिवसांच्या कालावधीत ६१७ रूग्ण मलेरिया बाधीत आढळून आले आहेत. यामुळे एटापल्ली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय मलेरियाबाधीत रूग्णांनी हाऊसफुल झाले असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी एटापल्ली तालुक्यातील गावागावात जाऊन रूग्णांना मलेरियाच्या गोळ्या वितरीत आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने संपूर्ण तालुकाभर आजाराविषयी जनजागृतीही सुरू आहे. मात्र अद्यापही एटापल्ली तालुक्यातील मलेरियाची साथ आटोक्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. असद फहीम यांच्याशी संपर्क साधला असता, मलेरियाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.