५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:25+5:30

आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा मृत्यू एकट्या सप्टेंबर महिन्यात झाला आहे. याशिवाय एकूण २८१८ रुग्णांपैकी १६४५ रुग्ण (५८ टक्के) सप्टेंबर महिन्यात बाधित झाले आहेत.

58% of coronaviruses infected in September | ५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित

५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित

Next
ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक : ३० दिवसात २० जणांना मृत्यूने कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी सप्टेंबर महिना सर्वाधिक पोषक ठरला आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी तब्बल ५८ टक्के रुग्ण केवळ या एकाच महिन्यातील आहेत. एवढेच नाही तर सप्टेंबर महिन्याच्या ३० दिवसात २० जणांचा मृत्यूही झाला आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ही परिस्थिती थोडी नियंत्रणात येईल, की यापेक्षाही स्थिती बिघडेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा मृत्यू एकट्या सप्टेंबर महिन्यात झाला आहे. याशिवाय एकूण २८१८ रुग्णांपैकी १६४५ रुग्ण (५८ टक्के) सप्टेंबर महिन्यात बाधित झाले आहेत. यावरून कोरोनाचा उद्रेक वाढण्यासाठी सप्टेंबर महिना किती घातक ठरला याची कल्पना येते.
बुधवारी आढळलेल्या नवीन १०७ कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली येथील ३४ जणांचा समावेश आहे. याशिवाय अहेरी येथील ९, आरमोरी येथील ७, चामोर्शी ७, कोरची येथील ३, कुरखेडा येथील २, वडसा येथील ७, मुलचेरा येथील २, एटापल्ली येथील २२, धानोरा येथील १२, भामरागड येथील २ जणांचा समावेश आहे.
गडचिरोलीमधील ३४ जणांमध्ये कन्नमवार वार्डचे २, आशीर्वाद नगर १, खरपुंडी १, सीआरपीएफ एमआयडीसी १, आयोध्यानगर २, कॅम्प एरिया ३, नवेगाव ५, गोकुळनगर १, आयटीआय चौक २, जेप्रा १, कोटगल १, लांजेडा १, माडेतुकूम १, मुरखळा १, विद्या भारती शाळेजवळ १, वियानी शाळेजवळ १, पंचवटी नगर १, अमिर्झा १, पोटेगाव रोड फॉरेस्ट कॉलनी १, रामपुरी वार्ड १, स्नेहा नगर, सोनापूर कॉम्प्लेक्स १, एसटी डेपोजवळ १, एसटी संकुल १ यांचा समावेश आहे.
कोरची तालुक्यामधील ३ असून त्यामध्ये बोरी १, गुटेकसा १ व शहरातील १ जण, कुरखेडा तालुक्यात २ असून एक अंगारा व एक नगरातील आहे. अहेरी येथील ९ मध्ये जणांत शहरातील ७ तर महागावचे २ जण आहेत. आरमोरी तालुक्यतील ७ मध्ये शहरातील ३, ठाणेगाव २ आणि वैरागडचे २ जण आहेत. भामरागड शहरातील २ जण बाधित आढळून आले आहेत. चामोर्शीतील ७ मध्ये शहरातील ३, आष्टी २, येनापूर १ व तळोधी १ आहे. धानोरा तालुक्यातील १२ मध्ये शहरातील २, मुरूमगाव १ व ९ जण पोलीस स्टेशन गोदलवाहीचे आहेत.
एटापल्लीमधील २२ जणांमध्ये १५ शहरातील सीआरपीएफ जवान आहेत तर हेडरीचे ७ जण आहेत. मुलचेरातील २ जण आहेत. देसाईगंजच्या ७ मध्ये सीआरपीएफ २, गांधी वार्ड १, कुरूड १, माता मंदिर १ व पोलीस स्टेशनजवळील एका जणाचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झालेल्या २६ जणांमध्ये गडचिरोलीमधील १७, अहेरी २, आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी २, सिरोंचा १, वडसा २ आदींचा समावेश आहे.

देसाईगंजमधील महिला दगावली
बुधवार दि.३० ला कोरोनाबाधित एका महिलेच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने घेतली. ती ६५ वर्षी महिला देसाईगंजच्या गांधी वॉर्डमधील रहिवासी होती. यासोबतच नवीन १०७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. दरम्यान २६ जण कोरानामुक्तही झाले आहेत. पण नव्याने वाढत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ८३८ झाली आहे.

Web Title: 58% of coronaviruses infected in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.