शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

५१७ गावे मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 00:57 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १७ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतींना मिळाला.

तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापन : ४८ कोटी ४ लाखांचे मिळाले उत्पन्नदिलीप दहेलकर गडचिरोलीराज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १७ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतींना मिळाला. तसेच या संदर्भात राज्यपालांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५१७ गावाच्या ग्रामसभांनी यंदा तेंदूसंकलन, विक्री व व्यवस्थापनाचे कार्य योग्यरीत्या पार पाडले. या माध्यमातून ५१७ गावांना एकूण ४८ कोटी ४ लाख ४ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या हित व कल्याणाच्या दृष्टीने राज्यपालांनी २०१४ रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र वन उत्पादन अधिनियम १९९७ मध्ये सुधारणा केली. यात बांबू व तेंदूसह गौण वनोपजाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोपजाची मालकी ग्रामसभा व ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. ३० आॅक्टोबर २०१४ च्या अधिसूचनेअन्वये भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये सुधारणा करून गौण वन उत्पादनासाठी वाहतूक परवाना देण्याचे अधिकार ग्रामसभांना प्रदान करण्यात आले आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामसभांना पर्यायी एक व पर्यायी दोन देण्यात आले. पर्यायी दोन अन्वये ग्रामसभा आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे तांत्रिक सहाय्य घेऊन तेंदूची विल्हेवाट लावू शकतात. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील ५१७ गावांनी ग्रामसभा घेऊन तेंदू संकलन विक्री व व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली जिल्ह्यात तेंदूचे संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी नऊ तालुक्यातील एकूण १३० ग्रामपंचायतींनी पर्याय दोनची निवड केली. यामध्ये एकूण ५७३ गावांचा समावेश आहे. ५६ गावांची माहिती अप्राप्तगडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या तेंदू हंगामात पेसा क्षेत्रातील एकूण १३० ग्रामपंचायतीमधील ५७३ गावांनी पर्यायी दोनची निवड करून तेंदू संकलन विक्री व व्यवस्थापनाचे कार्य केले. यापैकी ५१७ गावांनी ग्रामसभा घेऊन लिलाव प्रक्रिया पार पाडली. उर्वरित ५६ गावांनी ग्रामसभा घेऊन तेंदू संकलन व व्यवस्थापन केले. मात्र या ग्रामसभांना लिलाव प्रक्रियेतून नेमके किती उत्पन्न प्राप्त झाले. या संदर्भाची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला अद्यापही प्राप्त झाली नाही. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील १६, भामरागड तालुक्यातील ११ व धानोरा तालुक्यातील २९ गावांचा समावेश आहे.