शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

५०० कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही

By admin | Updated: August 18, 2014 23:28 IST

शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या

कुरखेडा : शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शिधापत्रीका नसल्याचे वास्तव नुकत्याच घेण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात उघडकीस आले आहे.आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाच्यावतीने येथील राजीव भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात कुरखेडा तालुक्यात मौशी, आंधळी, पलसगड, खेडेगाव, तळेगाव, अंतरगाव, सादूटोला, शिवणी, येरंडी, जांभुळखेडा, वासी, वाघेडा व पुराडा आदी गावातील २५० नागरिकांनी दर्शविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष शुभदा देशमुख होत्या. यावेळी मंचावर पुरवठा निरिक्षक के. टी. कुमरे, एस. जी. चव्हरे, नायब तहसीलदार ए. आर. पाथड, डी. टी. किरको आदी उपस्थित होते. सर्वांना पोटभर व सुरक्षीत अन्न मिळावे यासाठी शासनाने प्रत्येक गावी स्वस्त धान्य दुकान देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी आवश्यक शासन प्रणालीही लागू करण्यात आली आहे. असे असतानासुध्दा बऱ्याच गाव पातळीवर राशन स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था अडचणीत सापडली आहे. कुरखेडा तालुक्यातील जवळपास ५०० नागरिकांनी वर्षभरापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्यांना अद्यापही शिधापत्रिीका मिळालेली नाही. यामुळे त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अपुरा धान्यसाठा, पुरवठ्यातील अनियमितता, धान्य, साखर व केरोसीनची विक्री शासकीय दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठ्याची माहिती फलकावर नसणे आदी प्रश्नही या जनसंवाद कार्यक्रमात उपस्थि महिलांनी मांडले. यावेळी उपस्थित असलेले पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदारांनी पीडित नागरिकांना कार्यालयात बोलावून अडचणी दूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले. कुरखेडा तालुक्यासारखीच परिस्थिती अहेरी, कोरची, भामरागड, एटापल्ली, धानोरा या तालुक्यातही आहे. या तालुक्यातील अनेक नागरिक शिधापत्रिकांपासून वंचित असल्याचे दिसून येते. जनसंवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत कापसे, भारती सोनाग्रे, प्रशांत गेडाम, मधूसूदन नेवारे, देशीरताई घाटघुमर, जानकी बन्सोड, आशा तुलावी, चंदा दाऊदासरे आदींनी सहकार्य केले.