शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटीतून होणार ४९ विहिरी

By admin | Updated: January 11, 2016 01:19 IST

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्याच्या नऊ तालुक्याच्या नक्षलग्रस्त...

कामांना मिळाली मंजुरी : नऊ तालुक्यात होणार कामे; नक्षलग्रस्त गावात विशेष उपाययोजनादिलीप दहेलकर गडचिरोलीनक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्याच्या नऊ तालुक्याच्या नक्षलग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रूपयांच्या ४९ विहिरींच्या कामांना जिल्हा समन्वय समितीने मंजुरी प्रदान केली आहे. जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जानेवारी अखेरीसपासून सदर मंजूर कामे हाती घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस विभागामार्फत वर्षभर पोलीस अधिकारी व कर्मचारी गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त गावांना भेटी देतात. या अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही पोलीस विभागाकडून केला जातो. ग्रामभेटीदरम्यान पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक नक्षलग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीसुविधा नसल्याचे दिसून आले. यामुळे या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याशिवाय नक्षलग्रस्त जंगली भागात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जिल्हा पोलीस व सी-६० जवानांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमांतर्गत रस्ते, नाली, पिण्याच्या पाण्याची सोयीसुविधा व इतर विकासकामे जिल्हा प्रशासनाकडे सूचित केले जातात. पोलीस विभागाच्या मागणी नुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमांतर्गत दरवर्षी लाखो रूपयांची कामे मंजूर केली जातात. २०१५-१६ या आर्थिक वर्षात नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत नक्षलग्रस्त गावांमध्ये १० पिण्याच्या पाण्याच्या साध्या विहिरींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विहिरींची अंदाजपत्रकीय किमत ८ लाख ५० हजार रूपये आहे. मंजूर झालेल्या १० विहिरींच्या कामांमध्ये कोरची तालुक्यातील छोटा झेलिया, बोटेझरी, कुंभकोट, कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा, भामरागड तालुक्यातील कसनासूर, नेलगुंडा, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, अहेरी तालुक्यातील बिऱ्हाडघाट व सिरोंचा तालुक्यातील पुल्लीगुड्डम व कोपेला आदींचा समावेश आहे.नक्षलग्रस्त ३९ गावांमध्ये प्रत्येकी १ लाख रूपयांतून ३९ नवीन विंधन विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भामरागड तालुक्यातील भटपार, टेकला, मिडदापल्ली, धानोरा तालुक्यातील कनेरी, मुरगाव, दुर्गापूर, सावंगा, अहेरी तालुक्यातील सिंधा, छल्लेवाडा, व्यंकटापूर, तुमरकसा, झिमेला, सूर्यापल्ली, राजाराम, मद्दीगुड्डम, जिमलगट्टा, कोडसेलगुड्डम, रेपनपल्ली अशा एकूण ११ कामांचा, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, वांगेझरी, गोरगुट्टा, पिपली, एटावाही, हेडरी, वेरमागड, कसनसूर, भामरागड तालुक्यातील दोबुर, कुचेर, पद्दूर, कोसफुटी टोला या चार, कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर, गडचिरोली तालुक्यातील जमगाव, मौशीखांब या दोन गावातील कामांचा समावेश आहे.