शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळामार्फत कोरची व कुरखेडा तालुक्यात एकूण १४ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रामार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई झाली. उर्वरित धान सहकारी संस्थेच्या गोदामात तर काही धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळी धान खरेदीस अडचण : कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : पावसाळा तोंडावर आला असतानाही अजूनपर्यंत कोरची तालुक्यातील बेतकाठी, कोटगूल, बेडगाव या केंद्रांवरील जवळपास ४० हजार क्विंटल धानाची उचल करण्यात आली नाही.
आदिवासी विकास महामंडळामार्फत कोरची व कुरखेडा तालुक्यात एकूण १४ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रामार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई झाली. उर्वरित धान सहकारी संस्थेच्या गोदामात तर काही धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले झाले. तसेच शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केले होते. शासकीय खरेदी केंद्रावर मिळणारा भाव खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकऱ्यांनी ठोकळ धानाबरोबरच बारीक धानही विक्रीसाठी आणला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी झाली. आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे गोदाम फुल्ल झाल्याने उघड्यावरच ताडपत्री झाकून धान ठेवण्यात आले आहे. कोरची तालुक्यातील मसेली, कोरची, बेतकाठी, मर्केकसा, बोरी, कोटरा, बेडगाव, कोटगूल आदी केंद्रांवरील धान पडून आहे.
येत्या १५ दिवसांत पावसाला सुरूवात होणार आहे. पावसामुळे उघड्यावर ठेवलेले धान भिजून खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धान भिजल्यास आदिवासी विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे धान फेकून द्यावे लागले. विशेष म्हणजे कोरची तालुक्यातील काही शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. अजूनपर्यंत खरिपाच्या धानाची उचल झाली नसल्याने उन्हाळी धान खरेदी करण्यास आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी नकार दिला आहे. खरीपाच्या धानाची लवकर उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड