शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के महिला निरक्षर

By admin | Updated: September 9, 2014 23:30 IST

नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या

गडचिरोली : नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाणसुद्धा फारसे समाधानकारक नसून जिल्ह्यात सुमारे २० टक्के नागरिक निरक्षर आहेत.शिक्षणाशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली. ‘गाव तिथे शाळा’ सुरू केली. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन, मोफत गणवेश, पुस्तके आदी सवलती सुरू केल्या. याचा सकारात्मक परिणाम मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. जे नागरिक वयस्क आहेत, अशा नागरिकांसाठी शासनामार्फत निरंतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या वर्गातून हजारो नागरिक साक्षर झाले आहेत. तरीही १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्यात अजूनपर्यंत यश प्राप्त झालेले नाही. २०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. यामध्ये पुरूषांची लोकसंख्या ५ लाख ४१ हजार ३२८ तर महिलांची लोकसंख्या ५ लाख ३१ हजार ६१४ एवढी आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ८०.०२ टक्के तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ ६०.०७ टक्के एवढे आहे. तालुकानिहाय साक्षरतेमध्ये देसाईगंज तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये ८९.७१ टक्के पुरूष तर ७१.६९ टक्के महिला साक्षर आहेत. सर्वाधिक कमी साक्षरता भामरागड तालुक्यात आहे. यामध्ये ५३.५७ टक्के पुरूष तर ३४.४९ टक्के महिला साक्षर आहेत. गडचिरोली तालुक्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण ७९.०१ टक्के एवढे आहे. यामध्ये ६९.७५ टक्के स्त्रिया व ८७.९२ टक्के पुरूषांचे प्रमाण आहे. आरमोरी तालुक्याची एकूण साक्षरता ७६.०३ टक्के एवढी आहे. यामध्ये पुरूषांचे प्रमाण ८६ टक्के तर महिलांचे प्रमाण ६५.८५ टक्के एवढे आहे. कुरखेडात ८८.३३ टक्के पुरूष साक्षर आहेत. तर ६९.०४ टक्के महिला साक्षर आहेत. कोरची तालुक्यात ८०.३८ टक्के पुरूष तर ५९.८९ टक्के महिला साक्षर आहेत. धानोरा तालुक्यात ७७.०७ टक्के पुरूष व ५५.५९ टक्के महिला साक्षर आहेत. चामोर्शी तालुक्यात ८२.०३ टक्के पुरूष तर ६१.६५ टक्के महिला साक्षर आहेत. मुलचेरा तालुक्यात ८४.७८ टक्के पुरूष तर ६५.८२ टक्के महिला साक्षर आहेत. अहेरी तालुक्यात ७४.३८ टक्के पुरूष तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५५.९२ टक्के एवढे आहे. एटापल्ली तालुक्यात पुरूष साक्षरतेचे प्रमाण ६८.०५ टक्के तर महिलांचे प्रमाण ४९.३६ टक्के एवढे आहे. सिरोंचा तालुक्यात ६७.७८ टक्के पुरूष तर ४६.२३ टक्के महिला साक्षर आहेत. जिल्ह्यात महिला व पुरूषांच्या एकूण साक्षरतेचे प्रमाण केवळ ७०.०६ टक्के एवढे आहे. एक पुरूष सुशिक्षीत झाला तर त्याचा फायदा केवळ त्यालाच होतो. मात्र महिला साक्षर झाली तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. मात्र समाजातील चुकीच्या चालीरितीमुळे मुलींना शाळेत पाठविले जात नाही. त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुमारे २० टक्क्यांनी कमी आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाने मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मोफत बससेवा, मोफत प्रवेश, सायकल वाटप यासारख्या उपाययोजना योजल्या आहेत. तरीही मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)