शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:46 IST

गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजनावरांचाही मृत्यू : वीज पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. ऐन पावसाळ्यात धान रोवणीची कामे केली जातात. धो-धो पाऊस पडत असला तरी रोवणी सुरू होते. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाळ्याच्या दिवसात शेतात राहतात. परिणामी वीज पडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. वीज झाडाकडे आकर्षित होते. त्यामुळेही जीवितहानी होते. मेघगर्जना होत असल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये पाहिजे, त्या प्रमाणात जागृती नाही. त्यामुळेही जीव गमवावा लागतो. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील ३५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मानवाबरोबरच पाळीव प्राण सुध्दा विजांचे शिकार बनतात. मागील चार वर्षात शेकडो जनावरांना जीव गमवावा लागला आहे.विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज रोधक यंत्र लावला जातो. मात्र या यंत्राची विजेला अटकाव करण्याची क्षमता फार कमी राहते. वीजरोधक यंत्रापासून ५० ते ६० मीटर अंतरावर वीज पडणार असेल तर तेवढ्या अंतरावरील वीज स्वत:कडे खेचून वीजरोधक यंत्र वीज पडण्यापासून होणारी हानी थांबवू शकते. वीजरोधक यंत्राची ही मर्यादा आहे. विजेपासून संरक्षण करायचे असल्यास मेघगर्जना होत असताना शक्य तो घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय आहे.विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदीस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.जर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल.हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्नआपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विजेपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विजा पडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०१८ मध्ये वीज पडून एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मेघगर्जना होत असताना शक्यतो जवळपासच्या इमारतीचा आसरा घेणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे. मेघगर्जना सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस