शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटून ३२ तेंदू मजूर जखमी

By admin | Updated: May 14, 2017 01:42 IST

तेंदू बोद भराईच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ८४ मजूरांना अहेरी तालुक्यातील मन्नेराजारामकडे घेऊन जाणारा ट्रक

तीन गंभीर : पेरमिलीनजीकची घटना; तेंदू बोद भराईच्या कामाला जात होते लोकमत न्यूज नेटवर्क पेरमिली/आलापल्ली : तेंदू बोद भराईच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ८४ मजूरांना अहेरी तालुक्यातील मन्नेराजारामकडे घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने ३२ मजूर जखमी झाल्याची घटना पेरमिली पासून तीन किमी अंतरावर शनिवारी सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातील तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीमध्ये अशोक तुकाराम उंदीरवाडे (४५), बाळकृष्ण मारोती परसोळे (४०) व रामचंद्र भोयर (३५) सर्व रा. अंतरगाव (गायडोंगरी) यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाच्या हंगामाला वेग आला असून या कामासाठी कंत्राटदार मजूरांना वाहनाने कामाच्या ठिकाणी आणत आहेत. कंत्राटदार गौसुदीन यांनी मन्नेराजाराम ग्रामपचांयतीचा तेंदू युनिट खरेदी केला आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील अंतरगाव व गायडोंगरी या दोन गावातील ८४ मजुरांचा समावेश असलेल्या १२ चमू ट्रकने तेंदू बोद भराईच्या कामासाठी आणले जात होते. गडचिरोली मार्गे आलापल्ली-मन्नेराजारामकडे येत असताना सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मजूर घेऊन येणारा ट्रक पेरमिलीपासून तीन किमी अंतरावर उलटला. या ट्रकमध्ये एकूण ८४ मजूर होते. यापैकी ३२ जण जखमी झाले. त्यामधील तीन मजूर गंभीर जखमी असून इतर मजूर किरकोळ जखमी आहेत. मजूर घेऊन येणारा सदर ट्रक अंतरगाव येथून शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास मन्नेराजारामसाठी रवाना झाला, अशी माहिती जखमी मजुरांनी दिली. गंभीर तीन मजुरांना चंद्रपूरच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेचा तपास पेरमिलीचे ठाणेदार अशोक निमगिरे व पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.