शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी नेणारी ३२ जनावरे पकडली

By admin | Updated: October 5, 2015 01:42 IST

छत्तीसगड राज्यात कत्तलीसाठी चार वाहनांमधून नेण्यात येणारी ३२ जनावरे चामोर्शी पोलिसांनी पकडल्याची घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील नवेगाव रै. ...

चार वाहने जप्त : चौघांना अटक ; चामोर्शी पोलिसांची कारवाईतळोधी मो. : छत्तीसगड राज्यात कत्तलीसाठी चार वाहनांमधून नेण्यात येणारी ३२ जनावरे चामोर्शी पोलिसांनी पकडल्याची घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील नवेगाव रै. येथे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार वाहनांना जप्त करून चार आरोपींना अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चांद तासावार चाऊस रा. (२१) मूर्तिजापूर, इरशाद कुरेशी रफी रा. दिंदोरी जारवा, शहबाज अहमद रफीक अरमान रा. मूर्तिजापूर व अन्य एका आरोपीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी चामोर्शी मार्गावर नवेगाव रै. परिसरात गस्त घातली. दरम्यान तळोधी मो. परिसरातून या मार्गाने एमएच ३७ जे ९५६, एमएच ३० एबी २३६१, एमएच २७ एक्स ७५१७ व एमएच ३३-४७८१ क्रमांकाची चार वाहने येताना दिसली. पोलिसांनी सदर वाहने अडवून तपासणी केली असता, या चारही वाहनात जनावरे कोंबून आणत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सदर चारही वाहने तळोधी मो. ग्रामपंचायतीच्या परिसरात नेले. त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या समक्ष या जनावरांचा पंचनामा करून ३२ जनावरांना तेथील कोंडवाड्यात टाकले. यामध्ये १४ गायी व १८ बैलांचा समावेश आहे. चांद तासावार, इरशाद कुरेशी, रफी व शहबाज अहमद रफीक अरमान या तिन्ही वाहनचालकांना वाहनासह ताब्यात घेऊन चामोर्शी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चामोर्शी पोलिसांनी यातील चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडारे, पोलीस उपनिरिक्षक माने, बिट जमादार राजेश गुटके, मरस्कोल्हे, वडेट्टीवार, भांडेकर आदींनी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तल होणाऱ्या ३२ जनावरांना जीवदान मिळाले. (वार्ताहर)