शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ४१२ मजुरांची नोंदणी

By admin | Updated: May 1, 2016 01:19 IST

गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर मजुरांचे बाह्य जिल्ह्यात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे.

कामगार दिन : एका वर्षात ३४७ बांधकाम व घरेलू कामगारांची कार्यालयात नोंदगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर मजुरांचे बाह्य जिल्ह्यात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. परंतु बांधकाम व घरेलू कामावर बहुतांश मजूर अद्यापही काम करीत आहेत. जिल्ह्यात २०११ पासून मार्च २०१६ पर्यंत बांधकामावर २ हजार ७०६ तर घरेलू कामावर ७०६ असे एकूण ३ हजार ४१२ मजूर असल्याचे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात केलेल्या नोंदणीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने अनेक मजूर बाह्य जिल्हा व परराज्यात स्थलांतर करीत आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशातील हैद्राबाद व गुजरात राज्यातील सूरत, अहमदाबाद येथे विविध कामासाठी जिल्ह्यातील मजूर पलायन करीत आहेत. या माध्यमातून का होईना जिल्ह्यातील बेरोजगार रोजगार मिळवित आहेत. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत २०११ पासून मार्च २०१६ या कालावधीत ३ हजार ४१२ बांधकाम व घरेलू कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. तर २०१५- १६ या कालावधीत २२० बांधकाम मजूर व १२७ असे एकूण ३४७ मजुरांनी नावाची नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात बांधकामावर काम करणाऱ्या काम करणाऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. परंतु अनेक मजूर नाव नोंदणी करण्यास धजावत नाही. नाव नोंदणीसाठी लागणाऱ्या प्रक्रियेत गुंतण्यापेक्षा नोंदणी न केलेली बरी, असे अनेकांना वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील कामगार नाव नोंदणी करण्याबाबत उदासीन आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी असणे गरजेचे असते. (शहर प्रतिनिधी)कारवाफात आज बांधकाम मजूर नोंदणीकामगार दिनानिमित्त १ मे रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे सकाळी ११ वाजता बांधकाम मजुरी नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने कामगारांना योजनांची माहिती दिली जाईल, या हेतूनेच सदर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात बहुसंख्य मजुरांनी उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी एस. डी. पेंदोर यांनी केले आहे.