आमगावात ९ जागांसाठी २९ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:36+5:302021-01-19T04:37:36+5:30

आमगाव (म.) : चामाेर्शी तालुक्यातील ९ सदस्यसंख्या असलेल्या आमगाव (म.) ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात सुमारे २९ उमेदवार होते. प्रत्येक जागेसाठी ...

29 candidates for 9 seats in Amgaon | आमगावात ९ जागांसाठी २९ उमेदवार

आमगावात ९ जागांसाठी २९ उमेदवार

आमगाव (म.) : चामाेर्शी तालुक्यातील ९ सदस्यसंख्या असलेल्या आमगाव (म.) ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात सुमारे २९ उमेदवार होते. प्रत्येक जागेसाठी जवळपास तीन उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आमगाव हे परिसरातील सर्वात माेठे गाव आहे. नवीन पिढीने निवडणुकीत रस घेण्यास सुरूवात केल्याने निवडणुकीची रंगत वाढण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग क्र.१ मधील नामाप्रसाठी ३ उमेदवार, सर्वसाधारणसाठी ५, सर्वसाधारण महिलेसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र.२ मधील सर्वसाधारण गटाच्या जागेसाठी ३, नामाप्र महिलासाठी ३ उमेदवार, सर्वसाधारण महिलासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र.३ मध्ये अनुसूचित जाती २,अनुसूचित जाती महिलासाठी १, अनुसूचित जमाती महिलासाठी ३, सर्वसाधारण महिलासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत, असे एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: 29 candidates for 9 seats in Amgaon