शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

२५१ वनहक्क दावे प्रलंबित

By admin | Updated: October 27, 2016 01:48 IST

तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे ...

शेतकऱ्यांचे एसडीओंना निवेदन : दावे निकाली न काढल्यास आंदोलन करणारएटापल्ली : तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे निकाली न निघाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांना निवेदन सादर करून वनहक्क दावे निकाली काढण्याची मागणी केली. दावे निकाली न निघाल्यास आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील जारावंडी, दोलदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजिगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसूरवाही, सरखेडा व वंडोली येथील शेतकरी नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून मागीत तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत. महसूल विभाग, वन विभागात अतिक्रमित शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. सध्या या जमिनींवर शेतकरी पीक काढत आहेत. आपल्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे २५१ वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, अशी मागणी तालुका शेतकरी संघटना जारावंडी-कसनसूरच्या वतीने करण्यात आली. राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम एटापल्ली दौऱ्यावर आले असता त्यांनासुद्धा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करून प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव देविदास मोहुर्ले, सहसचिव जग्गू देहारी, धनराज गुरनुले, नसीरखॉ पठाण, रैजी पदा, लक्ष्मण चन्नेवार यांच्यासह शेतकरी बंडू नाईक, प्रेमसाय लकडा, बंडू हिचामी, सन्नू हिचामी, मल्लाजी येनगंटीवार, श्रावण कांबळे, प्रकाश गुरनुले, संपत चौधरी, नलेश मडावी, नाजू येरमे, देवाजी पोटावी, मनकू कातवो, बाजू नरोटे, जग्गू वड्डे, मयाराम हिचामी, नरसू नरोटे, सुरेश खलको, सोमा हलामी, कोरसे पावे, सीताराम नैैताम हजर होते.