शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माडिया जमातीच्या २५० लाभार्थ्यांना मिळणार घरकूल

By admin | Updated: July 4, 2015 02:22 IST

आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून ...

गडचिरोली : आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी अडीच कोटी रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभाग स्थापन करून या विभागाच्या मार्फतीने शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांचा लाभ आदिवासी समाजातील काही निवडक जमातींनाच मिळत आहे. आदिम जमाती मात्र या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांचा अजुनही विकास झाला नसल्याचे दिसून आले आहे. अजुनही आदिम जमातीतील नागरिक झोपडीवजा घरामध्येच जीवन कंठत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. या जमातीसाठी यावर्षी २५० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक घरकुलासाठी एक लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया डीआरडीएसोबतच आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीनेही करण्यात येणार आहे. मागील वर्षी १६९ घरकूल मंजूर करण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. तर काही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थ्यांची निवड डीआरडीएकडे असलेल्या प्रतीक्षा यादीतून केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्तच्या लाभार्थ्याने अर्ज केल्यास त्याचाही अर्ज स्वीकारला जाणार आहे. अधिकारी वर्गाकडून त्याच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतरच घरकूल मंजूर केले जाणार आहे. घरकूल बांधकामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे २ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. घरकूल लाभार्थ्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने केले आहे.आदिवासीमध्ये मोडणाऱ्या आदिम जमाती या सर्वात मागास जमाती आहेत. या जमातीच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडून विशेष योजना राबविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. त्यामुळे या जमातीच्या नागरिकांसाठी घरकूल योजना राबविली जात असून याचा फायदा त्यांना देण्यात येणार आहे. घरकुलासाठी अर्ज करण्याची पध्दतया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने त्याच्या ग्रामपंचायतीकडे या संदर्भातील अर्ज सादर करावा, अर्जासोबत पाणीपट्टीकर, विद्युत बिल, सातबारा, मालमत्ता नोंदणीपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, सरपंच व तलाठ्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जोडलेला अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फतीने पाठविता येणार आहे.