शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२२८ प्रज्ञावंत संशाेधकांनी मिळविली आचार्य पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : चंद्रपूर व गडचिराेली या दाेन जिल्ह्यासाठी असलेल्या गाेंडवाना विद्यापीठात संशाेधन करून आचार्य पदवी मिळविण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : चंद्रपूर व गडचिराेली या दाेन जिल्ह्यासाठी असलेल्या गाेंडवाना विद्यापीठात संशाेधन करून आचार्य पदवी मिळविण्यासाठी ३२ विषयात संधी आहे. विद्यापीठ निर्मितीपासून तर गेल्या पाच वर्षात या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयात तब्बल २२८ प्रज्ञावंत संशाेधकांनी आचार्य पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे संशाेधनासाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयाला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.

पीएचडीचा प्रबंध सादर करून पदवी मिळविण्यासाठी साधारणत: साडेचार ते पाच वर्षे लागतात. महिला व दिव्यांग उमेदवार २८० दिवसांची मुदत मागू शकतात. गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेलीमधून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतून गेल्या पाच वर्षात ९१ उमेदवारांनी आचार्य पदवी मिळविली आहे. मानव विद्या शाखेतून ६६, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून आतापर्यंत १८ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे. अंत:विषय अभ्यास शाखेतून ५३ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे. यामध्ये शिक्षण, शारीरिक शिक्षण, ग्रंथालय, विज्ञान व समाजकार्य आदी विषयांचा समावेश आहे. विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाला पीएचडीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

बाॅक्स...

विषयानुसार असे झाले आचार्य

- विज्ञान शाखेत गेल्या पाच वर्षात ९१ जणांनी पीएचडी प्राप्त केली. यामध्ये गणित १५, रसायनशास्त्र १७, भाैतिकशास्त्र ८, कॅम्पुटर सायन्स ८, इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरिंग १, प्राणीशास्त्र १६, पर्यावरण २, मायक्राेबायलाॅजी ८, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ३, बाॅटनी ९, मायनिंग इंजिनिअरिंगच्या ४ जणांचा समावेश आहे.

- मानव विद्या शाखेतील भूगाेल ६, राज्यशास्त्र ९, अर्थशास्त्र ८, समाजशास्त्र ६, मराठी १०, इंग्रजी १४, हिंदी २, विधी ४, मास कम्युनिकेशन १, इतिहास ४, पाॅली २ तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील १८ तसेच अंत:विषय अभ्यास शाखेतील ५३ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे.

काेट...

गाेंडवाना विद्यापीठाकडे आपण रितसर नाेंदणी करून प्राणीशास्त्र विषयात पीएचडी मिळविण्यासाठी अभ्यास व संशाेधन सुरू आहे. विद्यापीठ व तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळाेवेळी लाभत असल्याने सध्या काेणतीही अडचण जाणवत नाही. जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जाेरावर आपण यशस्वीरित्या पीएचडी मिळवू.

- सचिन येनगंधलवार, प्राध्यापक

...............

गाेंडवाना विद्यापीठाकडे पीएचडीसीठी नाेंदणी केली असून संशाेधन सुरू आहे. राज्यशास्त्र विषयात हे काम सुरू असून गडचिराेली येथील तज्ज्ञ प्राध्यापक माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून आपणाला वेळाेवेळी मार्गदर्शन मिळत आहे. शंकांचे निरसन हाेत आहे.

- बुलबुल वाळके, प्राध्यापक

.................

स्थानिकस्तरावर विद्यापीठ झाल्यामुळे पीएचडी करणे साेपे झाले आहे. नाेंदणी केल्यानंतर संशाेधन व अभ्यासाला सुरूवात केली जाते. तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आपण सातत्याने त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. अध्यापनासाेबतच संशाेधनाकडे आपले पूर्ण लक्ष आहे.

- लाेमेश बावनकुळे, प्राध्यापक