शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

22 हजार अर्जदार घरकुलाच्या यादीतून बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

ज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही, तसेच आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. मात्र या याेजनेचा लाभ तर ज्यांच्याकडे पक्के घर, चारचाकी वाहन, बंगला, बॅंक बॅलेन्स असणाऱ्यांनाही घ्यायचा आहे, असे दिसून येते. अशाच प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे खरे लाभार्थी याेजनपासून वंचित राहतात किंवा त्यांना याेजनेचा लाभच मिळत नाही. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : २०१८ मध्ये प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे २२ हजार ३८२ कुटुंबांचे अर्ज प्रधानमंत्री आवास याेजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत, तर ७९ हजार ९४० कुटुंबांचे अर्ज पात्र ठरले आहेत.प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत किती कुटुंबांना घरकुलाची आवश्यकता आहे, याबाबतची माहिती ग्रामसभांचे ठराव घेऊन मागविण्यात आली हाेती. यावरूनच प्राथमिक स्वरूपात ‘ड’ यादी बनविण्यात आली हाेती. ही यादी बनल्यानंतर २०१८ मध्ये प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. यात ज्या कुटुंबांनी अर्ज केला हाेता, त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती जाणून घेण्यात आली हाेती. तसेच अर्जदार राहत असलेल्या घराचा फाेटाेही काढण्यात आला हाेता. हीच माहिती घरकुलाशी संबंधित असलेल्या साॅफ्टवेअरमध्ये भरण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये जे अर्जदार बसले नाहीत, त्यांची नावे घरकुलासाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. 

पुन्हा नावांची सुनावणी होणारज्या पात्र लाभार्थ्यांची यादी आता घाेषित करण्यात आली आहे, त्या यादीतील नावे पुुन्हा सुनावणीसाठी ठेवली जाणार आहेत. यात पुन्हा काही अपात्र अर्जदार समाविष्ट असल्यास त्यांची नावे ग्रामसभेमार्फत कपात केली जाणार आहेत. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची प्राधान्य यादी बनविली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या लाभार्थ्याचे नाव जरी यादीत असले तरी, त्याला पुढच्यावर्षीच घरकुल मिळेल, याची अपेक्षा करू नये.

पक्के घर, चारचाकी वाहन असणाऱ्यांनाही हवे घरकुलज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही, तसेच आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. मात्र या याेजनेचा लाभ तर ज्यांच्याकडे पक्के घर, चारचाकी वाहन, बंगला, बॅंक बॅलेन्स असणाऱ्यांनाही घ्यायचा आहे, असे दिसून येते. अशाच प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे खरे लाभार्थी याेजनपासून वंचित राहतात किंवा त्यांना याेजनेचा लाभच मिळत नाही. 

प्रशासनाने केलेल्या सर्व्हेमध्ये गाेळा करण्यात आलेली माहिती घरकुलासाठी तयार करण्यात आलेल्या साॅफ्टवेअरमध्ये भरण्यात आली. यात निकषात न बसणारे अर्जदार साॅफ्टवेअरनेच अपात्र ठरविले आहेत. - साेमेश्वर पंधरे, विस्तार अधिकारी, डीआरडीए

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना