शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

शेतात दडविला हाेता १.९९ लाखांचा सडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 5:00 AM

दाेन पंचासह पाहणी केली असता, एका खड्ड्यात २०० लीटर क्षमतेच्या पाच नग प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लीटर इतका माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह ८४ हजार रुपये आहे. लगतच झुडपी जंगलात २०० लीटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये एक हजार लिटर माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह एक लाख पाच हजार रुपये आहे, तसेच महिला विक्रेती लता संजय मिश्रा हिच्या घरी १० हजार रुपये किमतीची ५० लिटर गूळ व माेहाची दारू सापडली.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्याच्या नवग्राम शेतशिवार व जंगल परिसरात पाेलिसांनी छापा मारून लपवून ठेवलेला गूळ व माेहाचा सडवा, तसेच साहित्य मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १६ सप्टेंबर राेजी गुरुवारी केली. नवग्राम गावालगतच्या जंगल परिसरात हातभट्टीची दारू गाळण्यासाठी ठिकठिकाणी गूळ व माेहाचा सडवा टाकून ठेवला असल्याची गाेपनीय माहिती चामाेर्शी पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून चामाेर्शी पाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बिपीन शेवाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शेतशिवार व जंगल परिसर गाठले. दाेन पंचासह पाहणी केली असता, एका खड्ड्यात २०० लीटर क्षमतेच्या पाच नग प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लीटर इतका माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह ८४ हजार रुपये आहे. लगतच झुडपी जंगलात २०० लीटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये एक हजार लिटर माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह एक लाख पाच हजार रुपये आहे, तसेच महिला विक्रेती लता संजय मिश्रा हिच्या घरी १० हजार रुपये किमतीची ५० लिटर गूळ व माेहाची दारू सापडली. हा सर्व मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. ही कारवाई प्रभारी अधिकारी बिपीन शेवाडे यांच्या नेतृत्वात पाेलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पाेलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, ज्ञानेश्वर लाकडे, देवेंद्र मजोके, एस.पी.ओ. चंपत मडावी, तसेच पाेलीस कर्मचाऱ्यांनी केली.

सणांच्या कालावधीत दारू विक्रीला ऊतपाेळा, गणेशाेत्सव या सणासुदीच्या कालावधीत चामाेर्शी तालुक्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात देशी,  विदेशी, माेहफूल दारूची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. पाेलिसांकडून कारवाई हाेत असली तरी रात्रीच्या सुमारास आडमार्गाने जिल्ह्याबाहेरून दारू येत असल्याचे चित्र आहे. दारू विक्रीला पूर्णत: राेख लावण्यासाठी चामाेर्शी शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय दारूची आयात-निर्यात थांबणार नाही.

घटनास्थळीच नष्ट केला गुळ व माेहसडवा- रासायनिक परीक्षणासाठी थाेडासा माल वेगळा काढून ठेवण्यात आला. उर्वरित सर्व मुद्देमाल पाेलिसांनी घटनास्थळी प्लास्टिक ड्रमसह नष्ट केला. याप्रकरणी आराेपी सराेनीत हरसिद सिकदार, महेश मनाेरंजन मंडल व लता संजय मिश्रा, सर्व रा. नवग्राम यांच्यावर चामाेर्शी पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार रमेश काेडापे व पाेलीस हवालदार याेगेश्वर वाकुडकर करीत आहेत. या कारवाईमुळे नवग्राम परिसरातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. छुप्या मार्गाने दारू येत असते.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस