शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

१८ गावातील विद्यार्थ्यांचा खड्डेमय मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:01 AM

चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती नाही : धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेवटर्कघोट : चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्गावर तीन फूट खोल व नऊ फूट लांबीचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यातूनच मानव विकास मिशनची बस दररोज आवागमन करते. त्यामुळे सदर मार्गाने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास मिशनची बस सुभाषग्राम ते घोट-मुलचेरा अशी धावते. सदर बस घोट येथे मुक्कामी राहते. पहाटे ५.३० वाजता ठाकूरनगर, नरेंद्रपूर, मलकापूर, तुमडी, सुभाषग्राम, गुंडापल्ली या गावातून जाते. या भागातील १८ गावांतील १२५ वर विद्यार्थी दररोज मानव विकास बसने प्रवास करून शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. मात्र सदर मार्ग पूर्णत: खड्डेमय झाल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. वसंतपूर-कोपरअल्लीपर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा संघर्ष अद्यापही कायम आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्ष आहे.

आमचे पाल्य शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी जातात. मात्र खड्डेमय मार्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावकरी व विद्यार्थी मिळून श्रमदानातून मुरूम टाकून सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे मुरूम अधिक दिवस टिकला नाही. गंभीर बाब असूनही प्रशासनाचे रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.- आकुल मंडल, सरपंच,ग्रा.पं.कालीनगर, ता.मुलचेराआमच्या भागातील जवळपास १५ ते १८ गावातील १३० पेक्षा अधिक विद्यार्थी मानव विकास बसने शिक्षणासाठी दररोज प्रवास करीत आहेत. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या मार्गाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- तपन सरकार, सरपंच, ग्रा.पं.वसंतपूर, ता.चामोर्शी 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा