शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जिल्ह्यात दीड वर्षात अपघातात १७१ ठार

By admin | Updated: August 6, 2015 02:11 IST

लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला.

२९५ घटना : ५०८ नागरिक झाले जखमीलोकमत विशेषसुनील चौरसिया  गडचिरोलीलोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला. तर २९५ अपघातांमध्ये ५०८ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा समावेश अधिक आहे. राज्यात अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये १४ ते २५ वर्षाच्या तरूणांची टक्केवारी ३२ टक्क्यावरून अधिक आहे.गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांच्या जवळ आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक लाख वाहने आहे. २०१४ या वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यात १९४ अपघात झाले. यामध्ये ११३ लोकांचा मृत्यू झाला. यात १०४ पुरूष व ९ महिलांचा समावेश आहे. या घटनांमध्ये ३३१ लोक जखमी झाले आहेत. तर २३७ पुरूष व ९४ महिला आहेत. २०१५ या वर्षात जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत १०१ अपघात झालेत. यात ५८ लोकांचा मृत्यू झाला. यात ५३ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. १७७ लोक अपघातात जखमी झाले आहेत. त्यात ११३ पुरूष व ६४ महिला सहभागी आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात २९५ रस्ते अपघातात ३६८ पुरूष जखमी झालेत व १५७ जणांचा मृत्यू झाला. यात दुचाकी वाहनावरून झालेल्या अपघाताची संख्या अधिक आहे. २०१० ते २०१२ मध्ये २९० अपघातात ३३७ लोकांचा बळी२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. महाराष्ट्रात महिन्याला साधारणपणे १ हजाराहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघाताच्या संख्येत महाराष्ट्र देशात तामिलनाडू खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षाकाठी १३ हजार जण मरण पावतात.गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते अपघाताची प्रमुख कारणेअहेरी-चंद्रपूर मार्गावर दिना नदीचा पूल तसेच आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर दरवर्षी वाहने पडून अपघात होतात. वैनगंगा नदीच्या पुलावर आजवर अपघातात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अरूंद व ठेंगणे पूल यामुळे अपघात होतात. हे एक प्रमुख कारण आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात पुलाचे कठडे काढल्यावर अनेक चारचाकी वाहने पुलात कोसळल्याच्या घटना मागील चार ते पाच वर्षात सातत्याने घडत आहे. आलापल्ली येथे एटापल्ली, सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या चौफुली मार्गावर अपघात होतात. येथे अनेकदा दुचाकीस्वारांना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. हे स्थळ अपघातप्रवण स्थळ आहे. या ठिकाणी भरधाव येणारी वाहने दुचाकीस्वारांसाठी काळ ठरतात. १८ वर्षांपेक्षा कमी वाहनचालकांचा भरणा आता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यांच्याकडे परवाना नसतानाही ते वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हाच प्रकार अप्रशिक्षित वाहनचालक ट्रॅक्टर चालवितात व शेतात काम करताना ट्रॅक्टर उलटून होणारे मृत्यू हे ही एक प्रमुख कारण आहे.मद्य प्राशन करून वाहने चालविणे हे ही जिल्ह्यात अपघातामागचे प्रमुख कारण आहे. अरूंद व छोटे रस्ते तसेच नादुरूस्त पूल आदींमुळे अनेक अपघात वर्षभरात होतात.