शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीसाठी १६ लाख रोपटे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सुविधा : वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवडीसाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शासनाचे विविध विभाग व सामान्य नागरिकांना रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. या दोन विभागामार्फत नागरिक व प्रशासकीय यंत्रणांना यावर्षी सुमारे १५ लाख ७९ हजार रोपटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.
गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या पाचही वन विभागांनी रोपटे लावले आहेत. सद्य:स्थितीत आलापल्ली वन विभागाकडे १७.२१ लाख, भामरागड वन विभागात ६७ हजार, गडचिरोली वन विभागात ३.४८ लाख, सिरोंचा ४.३५ लाख, देसाईगंज १.७९ लाख असे एकूण २७ लाख ५० हजार रोपटे उपलब्ध आहेत. त्यापैकी वन विभाग १४ लाख २१ हजार वृक्ष लागवड करणार आहे. यातून शिल्लक असलेले १३ लाख २९ हजार रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाकडेही ३ लाख ५० हजार रोपटे आहेत. त्यापैकी सामाजिक वनीकरण विभाग स्वत: १ लाख रोपटे लावणार आहेत. तर अडीच लाख रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.

नाममात्र किंमत आकारणार
नागरिक, सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवड करून ते जगवावे हा मुख्य उद्देश वृक्ष लागवडीमागे आहे. त्यामुळे नागरिकांना नाममात्र किंमतीत रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्ष लागवड योजनेची जागृती व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. तरीही नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे.

जुन्या मृत रोपट्यांच्या जागी नवीन लावणार
जिल्ह्यात नव्याने रोपटे लावण्यासाठी आता पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे जुने रोपटे जिवंत नसल्यास त्याच जागी नवीन रोपट्यांची लावगड करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग