१५ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

By Admin | Updated: January 11, 2017 02:18 IST2017-01-11T02:18:00+5:302017-01-11T02:18:00+5:30

खा. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोधी, कुनघाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राकेश कोठारे

15 workers entering BJP | १५ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

१५ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

खासदारांची उपस्थिती : निवडणुकीचा परिणाम
चामोर्शी : खा. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोधी, कुनघाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राकेश कोठारे यांच्यासह १५ युवा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तळोधी, कुनघाडा क्षेत्रात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये राकेश कोठारे यांच्यासह सुभाष वासेकर, महम्मद शेख, विनायक बारसागडे, अरूण कोठारे, जगदीश वासेकर, दिलीप बारसागडे, सचिन धाकडे, देविदास नैैताम, कोमल पातर, बाळकृष्ण सिडाम, दशरथ जोशी, रघुनाथ बावणे यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते भाजपचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, जिल्हा सचिव आनंद भांडेकर, प्रा. रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, किशोर गटकोजवार, उमेश कुकडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 15 workers entering BJP