शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या अडीच हजार जागांसाठी 14 हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

गेल्या दाेन वर्षांपासून काेराेना संकट आवासून उभे आहे. गतवर्षी काेराेनामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी काेराेनाचे संकट आटाेक्यात आले आहे. यावर्षी नव्याने दहावी उत्तीर्ण झालेले व गतवर्षी दहावी उत्तीर्ण झालेले, मात्र अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध ट्रेड अर्थात अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑगस्ट २०२१ आहे. गडचिराेली जिल्ह्यात सर्व संस्था मिळून एकूण २ हजार ५२० जागा आहेत. या जागांसाठी आतापर्यंत जिल्हाभरातून १४ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. जागा कमी व अर्ज अधिक असल्याने यंदा आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा हाेणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याकरिता १५ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला. यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल फुगल्यामुळे आयटीआय प्रवेशाला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गतवर्षी काेराेना संकटामुळे आयटीआय प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला हाेता. 

सप्टेंबरपासून सुरू हाेणार प्रवेशफेऱ्या३० ऑगस्ट २०२१ पर्यंत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण अर्जाची संख्या व प्रवेश प्रक्रियेचे नियाेजन संचालनालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गुणवत्तेनुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार ट्रेडची निवड करून प्रवेश घेणार आहेत. यावर्षी प्रवेश प्रक्रियेला थाेडासा विलंब हाेत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा चांगला प्रतिसाद- गेल्या दाेन वर्षांपासून काेराेना संकट आवासून उभे आहे. गतवर्षी काेराेनामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी काेराेनाचे संकट आटाेक्यात आले आहे. यावर्षी नव्याने दहावी उत्तीर्ण झालेले व गतवर्षी दहावी उत्तीर्ण झालेले, मात्र अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

काैशल्य प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्टया स्वावलंबी हाेण्याच्या उद्देशाने मी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. गुणवत्ता यादी व प्रवेश फेरीची प्रतीक्षा करीत आहे. - विशाल हिचामी

आधी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करायचा, त्यानंतर तंत्रनिकेतनचे शिक्षण घेण्याचे माझे नियाेजन आहे. त्यासाठी मी आयटीआय प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे.- प्रशांत रामटेके

 

टॅग्स :Educationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज