शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१३ दक्षता पथकांची राहणार नजर

By admin | Updated: May 13, 2017 02:11 IST

सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात खते, बियाणे, कीटनाशके व तत्सम कृषी निविष्ठांच्या व्यवहारात गैरप्रकार होऊ नये,

कृषी निविष्ठांचे व्यवहार : काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात खते, बियाणे, कीटनाशके व तत्सम कृषी निविष्ठांच्या व्यवहारात गैरप्रकार होऊ नये, याकरिता कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्तेवर तसेच व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांची नजर कृषी केंद्र संचालकांवर राहणार आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामातील पीक लागवड व नियोजन आराखडा कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानासह इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खताची एकूण २८० नोंदणीकृत परवानाप्राप्त कृषी केंद्र आहेत. तर २३६ कृषी केंद्र कीटकनाशक विक्रीची आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठाचे नमूना लक्षांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. यामध्ये बियाणे ५९० क्विंटल, रासायनिक खते ३९४ मेट्रीक टन इतका समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या कृषी निविष्ठाचे गावपातळीवर संयनियंत्रण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सन २०१७-१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे व गुणवत्तेचे कृषी निविष्ठा प्राप्त होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ व जिल्हास्तरावर १ अशा एकूण १३ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या कृषी निविष्ठाच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक व जिल्हास्तरावर एक यानुसार १३ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. खरीप पिकांच्या क्षेत्राची टक्केवारी ८६ आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर ही पिके प्रामुख्याने अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा या तालुक्यात घेतली जातात. गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १५०१ मिमी असून गतवर्षी सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५०.११ मिमी म्हणजे १०९.६८ टक्के पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १.७३ लाख हेक्टर असून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ०.२८ लाख हेक्टर तर उन्हाळी धानपिकाचे क्षेत्र ०.०२५ लाख हेक्टर इतके आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात २.०६ लाख हेक्टर क्षेत्रात धानासह इतर पिकांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. तर रब्बी पिकांची ०.२२ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. ६८८ मृद आरोग्य पत्रिका तयार शेतजमिनीतून भरघोस उत्पादन येण्यासाठी जमिनीचे माती परिक्षण तथा मृद सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मृद चाचणीसाठी नमूने घेतली जातात. सन २०१६-१७ या वर्षात सर्वसाधारण, सूक्ष्म, विशेष व पाणी नमूने मिळून एकूण १४ हजार ८५० नमूने तपासण्याचे लक्षांक देण्यात आले होते. यापैकी एकूण ६८८ नमून्याची तपासणी करण्यात आली व तेवढ्याच आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. मृद चाचणीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्य, जस्त, लोहा, जमिनीची सुपिकता आदींची तपासणी करण्यात आली.