शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१,१०० युवकांना मिळाला रोजगार

By admin | Updated: September 4, 2016 01:56 IST

स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०१० ते २०१६ या कालावधीत सुमारे १ हजार ८०१ युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले

आरसेटीचा उपक्रम : सहा वर्षांत १ हजार ८०१ बेरोजगारांना व्यवसायाचे प्रशिक्षणगडचिरोली : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०१० ते २०१६ या कालावधीत सुमारे १ हजार ८०१ युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले असून त्यापैकी सुमारे १ हजार १०० प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे. प्रत्येकच युवकाला शासकीय नोकरी देणे शक्य नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक विभागांच्या वतीने युवकांना व्यवसायाबाबतचे प्रशिक्षणही दिले जात आहे. गडचिरोली येथे स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची स्थापना २०१० साली करण्यात आली. सुरूवातीचे दोन ते तीन वर्ष युवकांना फारसे प्रशिक्षण देण्यात आले नाही. मात्र मागील दोन वर्षांपासून आरसेटीने प्रत्यक्ष काम करण्यास सुरूवात केली आहे. सध्या या संस्थेला एए रँकींग प्राप्त झाले आहे. आरसेटीच्या निर्मितीपासून ते आॅगस्ट २०१६ पर्यंत जिल्हाभरातील सुमारे १ हजार ८०० युवकांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर संबंधित युवकाने रोजगार टाकावा, यासाठी आरसेटीच्या वतीने इतरही मदत केली जाते. त्यामुळे या संस्थेच्या मार्फतीने प्रशिक्षण घेणारे युवक पुढे चालून रोजगार स्थापन करतात. १ हजार ८०१ प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे १ हजार १०० प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे. काही युवकांचा व्यवसाय वाढला असल्याने त्यांनी स्वत:च्याच व्यवसायात दोन ते तीन युवकांना कामावर ठेवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रोजगार करणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. आरसेटीचा विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते. स्वयंरोजगार निर्मितीतील अडथळे दूर होत असल्याने आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.