शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसात 10 तालुके माघारले, जलसाठे अजुनही निम्मेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ९३ टक्के पाऊस : राेवणीची कामे अंतिम टप्प्यात

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभरात ६३८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते; मात्र प्रत्यक्षात केवळ ५९४.६ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९३.१ टक्का एवढा पाऊस झाला. विशेष म्हणजे, चामाेर्शी व सिराेंचा हे दाेन तालुके वगळले तर उर्वरित सर्वच १० तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढतो मात्र मध्यंतरी बरेच दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे हाेऊ शकले नाही. १५ दिवसांपूर्वीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. तरीही काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकरी अजूनही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तलाव केवळ ५० टक्केच भरले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत  आहेत. 

हलक्या धानाची मुदत संपलीज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही असे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान असे संबाेधले जाते. यावर्षी जून महिन्यात अगदी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानाचे पऱ्हे वेळेवर टाकण्यात आले. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. परिणामी धान राेवणीला वेळेवर सुरूवात हाेऊ शकली नाही. हलक्या धानाची राेवणी पऱ्हे टाकणीपासून एक महिन्याच्या कालावधीत हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लाेटत चालला आहे. हलके धान गर्भात येण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी हलके धान न राेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चार महिन्याच्या सरासरीच्या

गडचिराेली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या हे प्रमाण ४७.३६ टक्के एवढे आहे. म्हणजेच अजूनही ५० टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो.  त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण