शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फिफा विश्वचषकातून इराण बाहेर पडणार? अमेरिका-इस्रायल संघर्षाचा फुटबॉलला फटका; इराक किंवा यूएईला मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:01 IST

FIFA World Cup 2026: इराण-अमेरिका युद्धामुळे फिफा विश्वचषक २०२६ मध्ये इराणच्या सहभागावर टांगती तलवार आहे. अमेरिकेने व्हिसा नाकारल्यास किंवा इराणने माघार घेतल्यास इराक किंवा यूएईला वर्ल्डकपचे तिकीट मिळू शकते.

जिनिव्हा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या अमेरिकेच्या पुढाकारानंतर मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाची तीव्रता वाढल्यामुळे तीन महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इराणचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत इराणच्या जागी इराक किंवा संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांना संधी दिली जाऊ शकते.

इराणला विश्वचषकात साखळी फेरीतील ‘ग’ गटात तिन्ही सामने अमेरिकेत खेळायचे आहेत. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. तसेच, इराणने २०२२ विश्वचषकाचे यजमान कतार व सौदी अरेबियासह अमेरिकेच्या सहयोगी देशांवरही क्षेपणास्त्र डागले. 

आशियाई फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष व इराणचे वरिष्ठ फुटबॉल अधिकारी मेहदी ताज म्हणाले की, ‘या हल्ल्यानंतर आम्ही विश्वचषकातील सहभागाबाबत सकारात्मकतेने पाहू शकत नाही.’ विश्वचषकासाठी इराण आपला संघ पाठवणार की नाही किंवा अमेरिकन सरकार त्यांना प्रवेश देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराक थेट प्रवेश करणार?आशियाई पात्रता फेरीत इराक आणि यूएई अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर होते. इराकने प्लेऑफमध्ये यूएईचा पराभव केला होता आणि विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी या संघाला ३१ मार्च रोजी बोलिव्हिया किंवा सुरिनामविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळविल्यास इराक विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवेल. तसेच, पराभव झाला आणि इराणने माघार घेतली, तर इराकला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२IranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध