शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जर्मन पोहचले उपांत्यपूर्व फेरीत, १७ वर्षाआतील विश्वचषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:04 AM

जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले.

नवी दिल्ली : जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले. जर्मन संघाने कोलंबियाच्या बचाव फळीतील उणिवांचा फायदा घेत त्यांना युरोपियन फुटबॉलच्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले.साखळी सामन्यात इराणकडून झालेल्या मोठ्या उलटफेरानंतर जर्मनीच्या संघाने दमदार खेळ केला. लॅटिन अमेरिकन संघ कोलंबिया या सामन्यात झुंजताना दिला. त्यांनी काही वेळा चांगल्या चाली रचल्या आणि गोलपोस्टवर हल्ले केले. मात्र त्यांना एकही गोल करण्यात यश आले नाही. दहाव्यांदा या स्पर्धेत खेळणा-या जर्मनीसाठी कर्णधार जॉन फिते आर्प याने सातव्या आणि ६५ व्या मिनिटाला दोन गोल केले. त्यासोबतच त्याचे या स्पर्धेत चार गोल झाले. यान बिसेक याने ३९ व्या, तर जॉन येबोआ याने ४९ व्या मिनिटाला गोल केले.आर्प याने सातव्या मिनिटालाच कोलंबियाचा गोलकीपर केवीन मीर याच्या चुकीचा फायदा घेतला. त्याने गोल करत १-० ने आघाडी घेतली. मिडफिल्डर जॉन येबेओने कोलंबियाच्या डिफेंडरला चकवा देत आर्पला पास दिला. आर्पने थेट गोलपोस्टमध्ये बॉल मारला.त्यानंतर जर्मन संघ थोडा सुस्त वाटला. कोलंबियाच्या संघाने ३० व्या मिनिटाला बरोबरीचे दोन चांगले प्रयत्न केले. मात्र थोड्याच वेळात जर्मन संघाने पुन्हा एकदा कोलंबियाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला. तीन मिनिटांनी येबोआचा शानदार शॉट गोलपोस्टबाहेरच राहिला. अन्यथा जर्मन संघाची आघाडी दुप्पट झाली असती. मात्र ३९ व्या मिनिटाला यान बिसेक याने कॉर्नर शॉटवर संघासाठी हेडरद्वारे गोल नोंदवला. दुस-या हाफमध्ये जर्मनीने मैदानात येताच आक्रमकता दाखवली. कर्णधार कॉर्प याने ४९ व्या मिनिटाला येबेआकडे पास दिला.  त्याने थेट गोल करत आघाडी ३-० अशी वाढवली. कर्णधार आर्प याने ६५ व्या मिनिटाला संघाकडून चौथा आणि आपला दुसरा गोल केला. त्यानंतर जेंसी नगानकाम याला मैदानात उतरवण्यात आले.(वृत्तसंस्था)चार वेळा फिफा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या जर्मनीला यानिक केटेल याच्या दुखापतीमुळे धक्का बसला. मात्र त्यांनी जोशा वागनोमान याला मैदानात उतरवले. जर्मनीचा संघा ३२ वर्षांपूर्वी स्पर्धेत उपविजेता राहिला आहे. तर कोलंबियाचा संघ सहाव्यांदा या स्पर्धेत खेळत आहे. मात्र त्यांना आपल्या ख्यातीनुसार खेळ करता आलेला नाही.जर्मन संघाने केलेले गोल७ वा मिनिट जॉन फिते आर्प३९ वा मिनिट यान बिसेक४९ वा मिनिट जॉन येबेआ६५ वा मिनिट जॉन फिते आर्प

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलIndiaभारत