Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:18 AM2018-06-19T10:18:33+5:302018-06-19T10:18:33+5:30

रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला सौदी अरेबियाचा संघ सोमवारी थोडक्यात बचावला.

Fifa World Cup 2018: A fire in the plane's engine, Saudi team safe! | Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला!

Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला!

Next

मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला सौदी अरेबियाचा संघ सोमवारी थोडक्यात बचावला. सौदी अरेबियाचा संघ सेंट पीटर्सबर्ग येथून रोस्टोव्ह येथे जात असताना विमानाच्या इंजिनाला आग लागली. सुदैवाने विमान सुरक्षितरीत्या जमिनीवर उतरवण्यात वैमानिकाला यश आले. त्यामुळे  मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरम्यान, या घटनेत कुठल्याही खेळाडूला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.  
या आपघाताबाबत माहिती देताना  संबंधित विमान कंपनीने सांगितले की, कदाचित विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी अडकल्याने विमानामध्ये बिधाड झाला. मात्र विमान कंपनीने विमानात आग लागल्याचे वृत्त फेटाळले आहे. पण सोशल मीडीयावर फिरत अललेल्या एका व्हिडिओमध्ये या विमानात आग लागल्याचे दिसत आहे. 




 सौदी अरेबियाच्या संघाच्या ट्विटर हँडलवरूनही सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सौदी अरेबियाचा फुटबॉल संघ प्रवास करत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र संघातील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत, सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

Web Title: Fifa World Cup 2018: A fire in the plane's engine, Saudi team safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.