Shravan Special Recipe of sweet potato sheera or ratalyacha shira in marathi | श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा
श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा

श्रावण महिना सुरू झाला असून अनेकजण श्रावणात उपवास करतात. श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार यांसारख्या दिवशी उपवास करण्यात येतो. कामाचा ताण आणि त्यात उपवास प्रत्येकालाच जमतचं असं नाही. अशातच तुम्हीही उपवास करणार असाल पण तुम्हाला यादिवशी एखादा हटके पदार्थ खायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके ऑप्शन सुचवणार आहोत. हा पदार्थ उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक ठरतो. 

आज आपण जाणून घेणार आहोत रताळ्याचा शिरा तयार करण्याची पाककृती... 

साहित्य : 

  • अर्धा किलो रताळी
  • दीड वाटी साखर
  • 2 मोठे चमचे तूप
  • 8-10 काजू, बदामचे तुकडे 
  • 5-6 वेलदोडे

 

कृती : 

- रताळी स्वच्छ धुवून सालासह किसून घ्यावीत. 

- जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकावे. 

- तूप गरम झाल्यावर रताळ्याचा कीस चांगला मंद आचेवर शिजवून घ्यावा. 

- कीस शिजला की त्यात साखर घालावी. 

- साखर व कीस एकजीव झाल्यावर वेलची पूड घालावी. 

- वरून काजू-बदाम टाकावेत.

रताळ्याचे फायदे...

फायबरचा उत्तम स्त्रोत 

रताळ्यामध्ये फायबरचे मुबलक प्रमाणात असते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. 

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते :

रताळ्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असले तरीही त्यामधून शरीराला adiponectin नामक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणार्‍या हार्मोन्सला चालना देण्याचे काम करते. रताळ्यामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर झटकन वाढत नाही. त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी रताळं वाफवून आहारात  घ्यावे.


Web Title: Shravan Special Recipe of sweet potato sheera or ratalyacha shira in marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.